मुंबई

प्रजासत्ताक दिन संचलनात आंबेडकर स्मारकाची प्रतिकृती

सकाळवृत्तसेवा

मुंबई - इंदू मिलमध्ये ‘भारतरत्न’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात हे स्मारक कसे असेल, याची प्रतिकृती प्रजासत्ताक दिनी शिवाजी पार्कमधील संचलनात पाहण्यास मिळणार आहे. एमएमआरडीएकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिलवरील स्मारकाच्या प्रतिकृतीवर चित्ररथ साकारण्यात येत आहे. याचे काम वांद्रे-कुर्ला संकुलातील सीबीआय कार्यालयाजवळील मैदानावर सुरू आहे. 

डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी या वर्षी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात त्यांच्या स्मारकाच्या प्रतिकृतीचा चित्ररथ तयार करण्यात येणार आहे. या चित्ररथाचे काम जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे माजी प्राध्यापक नरेंद्र विचारे करत आहेत. या चित्ररथाची कल्पना एमएमआरडीएचे जनसंपर्क अधिकारी दिलीप कवटकर यांची आहे. 

चित्ररथाचा आकार २९ फूट लांब १३ फूट रुंद आणि १६ फूट उंच असा आहे. या चित्ररथात बाबासाहेबांचे भव्य शिल्प साकारण्यात आले आहे. या चित्ररथाद्वारे ‘मार्ग समतेचा..विचार मानवतेचा..’ हा संदेश देण्यात येणार आहे. चित्ररथाचे काम अंतिम टप्प्यात सुरू असून शुक्रवारी हा चित्ररथ शिवाजी पार्क येथे नेण्यात येणार असल्याचे प्रा. विचारे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT