Resignation of President of Pimpaleshwar Temple due to revenge politics of Shinde government mumbai
Resignation of President of Pimpaleshwar Temple due to revenge politics of Shinde government mumbai  sakal
मुंबई

डोंबिवली : शिंदे सरकारच्या सूडाच्या राजकारणामुळे पिंपळेश्वर मंदिराच्या अध्यक्षांचा राजीनामा?

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - डोंबिवली मधील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश म्हात्रे यांनी रविवारी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. अध्यक्षपदाची 3 वर्षे बाकी असताना म्हात्रे यांनी अचानक राजीनामा दिला आहे. राजकीय दबावामुळे हा राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

म्हात्रे हे ठाकरे गटाचे असल्याने शासन स्तरावर ट्रस्टच्या अनेक कामांना हरकत घेतली जात होती. तसेच समितीमधील इतर सदस्यांवर देखील दबाव आणला जात होता. या सूडाच्या राजकारणामुळे म्हात्रे यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

डोंबिवलीतील सांगावं येथे 100 वर्षाहुन अधिक जुने असे श्री पिंपळेश्वर मंदिर देवस्थान आहे. या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त झाला असून श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ यांच्यावतीने या मंदिराचा कार्यभार चालत आला आहे. या ट्रस्टवर प्रकाश म्हात्रे हे गेली 12 वर्षे कार्यभार सांभाळत आले आहेत.

13 व्या वर्षीही त्यांच्याच गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडली असून दोन वर्षाचा कार्यकाल त्यांनी पूर्ण केला आहे. तीन वर्षाचा कार्यकाल शिल्लक असताना म्हात्रे यांनी रविवारी ट्रस्टच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला.

रविवारी ट्रस्टच्या बैठकीत म्हात्रे यांचा राजीनामा मंजुर देखील करण्यात आला आहे. माझी तब्येत ठिक नसते, या कारणाने मी अध्यक्षपदाचा कारभार पूर्ण क्षमतेने करु शकत नाही. पदास न्याय देऊ शकत नसल्याने मी अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचे म्हात्रे यांनी आपल्या राजीनामा मध्ये म्हटले आहे.

म्हात्रे यांनी राजीनामा दिल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे. कट्टर शिवसैनिक, बाळासाहेबांचे खंदे समर्थक म्हणून म्हात्रे यांच्याकडे पाहीले जाते. शिवसेनेतील दुफळीच्या आधी शिवसेनेचे कल्याण तालुका प्रमुख म्हणून म्हात्रे यांनी शिवसेनेचे कामकाज पाहीले आहे. दुफळी नंतर म्हात्रे यांनी बाळासाहेबांच्या विचाराशी एकनिष्ठ असल्याचे सांगत ठाकरे गटात ते कायम राहीले होते.

ठाकरे गटात त्यांना कल्याण ग्रामीण मधील उप जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली असून ते कामकाज पहात आहेत. श्री पिंपळेश्वर महादेव मंदिर हे डोंबिवलीतील तीर्थक्षेत्र असून ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक उपक्रम हे म्हात्रे यांच्या कार्यकाळात राबविले गेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकट वर्तीय म्हणून म्हात्रे यांच्याकडे पाहीले जात होते.

शिवसेनेतील दुफळी आणि म्हात्रे यांचा ठाकरे गटास समर्थन यामुळे गेल्या काही महिन्यांपासून ट्रस्टच्या शासन स्तरावरील कामांस हरकत घेतली जात होती. समितीतील इतर सदस्यांना देखील ते अध्यक्ष पदावर असल्याने काम कसे होणार असे बोलले जात होते. त्यांच्यावर सातत्याने दबाव आणला जात होता. या राजकीय खेळामुळे म्हात्रे यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे अशी माहिती खास सुत्रांनी दिली आहे.

श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ ट्रस्टच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मी दिला आहे. माझ्या वैयक्तिक कारणामुळे मी हा राजीनामा दिला आहे.

- प्रकाश म्हात्रे, अध्यक्ष, श्री पिंपळेश्वर महादेव भक्त मंडळ ट्रस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: "फक्त आरोप करता, पुरावे द्या...", कॅनडात 3 भारतीयांच्या अटकेला भारताचे चोख उत्तर!

Chinmay Mandlekar: "मला वाटलं ते मुस्काटात मारतील..."; चिन्मय मांडलेकरनं सांगितला रजनीकांत यांच्या भेटीचा किस्सा

Banmeet Narula: डार्क वेबद्वारे ड्रग्ज विकणारांना ईडीने उचलले; 130 कोटी रुपयांचे बिटकॉईन जप्त

तुम्‍ही सत्तेत असताना इथले उद्योग गुजरातला का गेले? नारायण राणेंच्या प्रचारसभेत राज ठाकरेंचा उद्धव यांना थेट सवाल

Latest Marathi News Live Update : इस्त्रायलमध्ये घुमला, 'अब की बार 400 पार'चा नारा

SCROLL FOR NEXT