सॅनिटायझर डोमचा वापर धोकादायक; केंद्र सरकारचा शिक्कामोर्तब 
मुंबई

लॉकडाऊन वाढले... अन्‌ त्यांच्या रोजीरोटीवरच आली गदा! हंगाम हातचा गेला...

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनमुळे कार्यक्रम, सांस्कृतिक मेळावे, लग्नसराई रद्द झाले. 3 मेपर्यंत कोणतेच कार्यक्रम, लग्न समारंभ होणार नाहीत. त्यानंतर संचारबंदी शिथिल केली; तरी गर्दी टाळण्यासाठी या कार्यक्रमावर बंदी असण्याची शक्‍यता आहे. कदाचित जूनमध्ये स्थिती काहीशी पूर्वपदावर येईल; मात्र तोपर्यंत आमचा कमाईचा हंगाम संपलेला असेल, अशी व्यथा छायाचित्रकारांनी व्यक्त केली आहे. मार्चपासून अनेकांच्या छायाचित्रण, व्हिडीओ शूट, वेडिंग डेस्टिनेशन ऑर्डर रद्द झाल्या आहेत. त्यात लॉकडाऊन वाढल्याने छायाचित्रकारांच्या रोजगारावरच गदा आली आहे. 

केवळ लग्नसराईचे छायाचित्रकारच नव्हे तर वेबसिरीज, शॉर्ट फिल्म मेकर या क्षेत्रातील छायाचित्रकारांचाही रोजगार बुडाला आहे. गेल्या महिनाभरापासून छायाचित्रकारांचे काम बंद आहे. मार्च, एप्रिल, मे हा लग्नसराईचा हंगाम असतो. त्यामुळे एका छायाचित्राकडे पाच-पाच ऑर्डर असतात. गेल्या दोन वर्षांपासून प्री वेडिंग फोटोशूट फॅड निघाले आहे. त्याच्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळतात; मात्र कोरोनामुळे पर्यटन क्षेत्र सर्वांत पहिले बाधित झाले. त्यामुळे मार्चमध्ये त्यांच्याही ऑर्डर रद्द झाल्या. सध्या काहीच काम नसल्याने येणारे दिवस कसे काढायचे, असा प्रश्‍न पडल्याचे छायाचित्रकारांनी सांगितले. अनेक छायाचित्र फ्रीलान्सर म्हणून काम करतात. त्यांची अवस्थाही बिकट आहे. 

बदलापूर येथे राहणारे वैभव गडहिरे सांगतात, "मी शॉर्ट फिल्म मेकर म्हणून काम करतो. इव्हेंट फोटो शूट, लग्नाचे शूट करतो. तसेच सिनेफोटोग्राफी करतो, परंतु कोरोनामुळे सगळे ठप्प आहे. प्रॉडक्‍शन हाऊस बंद आहे. त्यामुळे रोजगार नाही. लग्नसराईच्या मार्च व एप्रिल महिन्याच्या ऑर्डर होत्या. त्याही रद्द झाल्या. एप्रिलमधील तीन ऑर्डर होत्या आणि मेच्याही मिळणार होत्या. आता त्याही मिळण्याची शक्‍यता नाही. मी मुंबईत भाड्याने राहतो. घरभाडे भरण्याबाबत सरकारने सूट दिली असली, तरी नंतर ते भरावेच लागणार आहेत. तेव्हा पैसे कुठून आणायचे.' 

लॉकडाऊन संपल्यानंतरही लग्नसराईचे मुहूर्त लगेच निघणार नाहीत. त्यामुळे डिसेंबर किंवा पुढच्या वर्षीची वाट बघावी लागणार आहे. या महिन्यात लग्नाच्या पाच फोटो शूट आणि व्हिडीओ शूटच्या ऑर्डर होत्या. सर्व रद्द झाले. पूर्वीच्या कमाईतून कसेबसे घर चालवत आहे. ही परिस्थिती पूर्ववत होण्यासाठी जून उजाडण्याची शक्‍यता आहे. त्या वेळी आमचा कमाईचा हंगाम संपलेला असेल. 
- प्रशांत पाटील, वेडिंग फोटोग्राफर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT