आदित्य ठाकरेंच्या मतदार संघामुळे अवघी मुंबई हादरलीये! वाचा नेमकं काय झालंय...

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 19 April 2020

राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदार संघ. कोळी, आगरी आणि कष्टकऱ्यांची ही वसाहत. वरळी कोळीवाडा हा विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने अवघी मुंबई हादरली.

मुंबई : राज्याचे पर्यावरणमंत्री आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा वरळी हा मतदार संघ. कोळी, आगरी आणि कष्टकऱ्यांची ही वसाहत. वरळी कोळीवाडा हा विभाग कोरोनाचा हॉटस्पॉट झाल्याने अवघी मुंबई हादरली. वरळी कोळीवाडा सील झाला आणि मुंबईचे हाल सुरू झाले. कोळी बांधवांची मासेमारी ठप्प झाली. लॉकडाऊनमुळे छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय बंद झाल्याने त्यावर जगणाऱ्या लोकांचे हाल झाले. लॉकडाऊनमुळे कोळीवाड्यातील नागरिकांचे बेसुमार हाल झाले. सुरुवातीलाच वाऱ्याच्या वेगाने रुग्णांची संख्या वाढत गेली. अखेर पोलिसांनी कोळीवाड्याचा ताबा घेतल्याने सुरुवातीच्या दोनचार दिवसांत काय करावे कोणालाच कळत नव्हते; मात्र त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने धान्यवाटप सुरू झाले, जीवनावश्‍यक वस्तूंचा पुरवठा सुरू झाला. आरोग्य यंत्रणांच्या नियोजनामुळे विभागात आता रुग्णांची संख्या कमी होत असून ही समाधानाची बाब आहे. 

ही बातमी वाचली का? लॉकडाऊनच्या काळात मंत्रालयात जाणे झालंय सोपं!

पहिला हॉटस्पॉट 
कोरोनाबाधितांमुळे मुंबईतील हॉटस्पॉट ठरलेल्या वरळी कोळीवाड्यातील सुमारे 80 हजार नागरिकांचा जीव धोक्‍यात येऊ नये म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार वरळी कोळीवाडा संपूर्णपणे प्रथमच सील करण्यात आला आहे.

ही बातमी वाचली का? 'वर्क फ्रॉम होम'मुळे दुधाच्या मागणीत दुपटीने वाढ
 
कोळीवाड्यात कोरोना आला कसा? 
वरळी कोळीवाड्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांपैकी कोणीही परदेशात गेले नव्हते. त्यामुळे बाधितांचा आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे हे अद्यापही आरोग्य यंत्रणेपुढील मोठे कोडे आहे. 

ही बातमी वाचली का? मातांनो, आता बाळाची काळजी घ्या 

यंत्रणा सतर्क 
कोळीवाड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी पोलिस, अग्निशमन दल, पालिकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. संपूर्ण कोळीवाड्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी कोळीवाड्यातील दुकाने, फेरीवाले, भाजीपाला, दूध विक्री केंद्र, धान्याची दुकाने, औषध दुकाने, बाजार बंद ठेवण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने आता ती काही प्रमाणात सुरू केली आहेत. 

ही बातमी वाचली का? झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना

विलगीकरणातील अडचणी 
वरळी कोळीवाडा परिसरात बहुतांश घरे लहान आणि दाटीवाटीची आहेत. त्यामुळे एखादा संशयित रुग्ण आढळल्यास त्याला विलगीकरण करून स्वतंत्रपणे ठेवणे अशक्‍य आहे. संशयित रुग्णांना तात्काळ कस्तुरबा किंवा भाटिया रुग्णालयात हलवण्यात येत आहे. तसेच येथील 35 टक्के नागरिक सार्वजनिक शौचालयांचा वापर करत असल्याने सोशल डिस्टन्सिंग पाळणे कठीण आहे. 

नागरिकांना काही आवश्‍यक वस्तू, सामान, दूध खरेदी करण्यासाठी शिथिलता आणली आहे. जीवनावश्‍यक वस्तू नागरिकांच्या दारापर्यंत पोचवल्या जात आहे. 
- हेमांगी वरळीकर, माजी उपमहापौर 

कोळीवाड्यातील लोकांपर्यंत आणखी जीवनावश्‍यक वस्तू पोहोचल्या पाहिजेत. कोळी बांधवांचा व्यवसाय, छोटे व्यवसाय ठप्प झाले आहेत. त्यांना सरकारने मदत करावी. 
- श्‍याम निंबाळकर, स्थानिक. 

ही बातमी वाचली का? दिव्यांगाचे बाणेदार उत्तर... माझ्यापेक्षा गरिबांना मदत करा

वरळी कोळीवाड्याबाबत 

  • एकूण लोकसंख्या ः 80 लाख 
  • कोळी आणि आगरी ः 40 टक्के 
  • इतर समाजघटक ः मराठी, उत्तर भारतीय, मुस्लिम 
  • मुख्य व्यवसाय ः मासेमारी आणि छोटे-मोठे उद्योग 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Worli Koliwada Mumbai's Corona Hotspot