लॉकडाऊनच्या काळात मंत्रालयात जाणे झालंय सोपं!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 एप्रिल 2020

मंत्रालयात सोमवारपासून (ता. 20) 30 टक्के कर्मचारी; तर इतर सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त मंत्रालय आणि इतर ठिकाणांसाठी 22 बसच्या 100 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. 

मुंबई : मंत्रालयात सोमवारपासून (ता. 20) 30 टक्के कर्मचारी; तर इतर सरकारी कार्यालयांत 10 टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये सुरू असलेल्या नियोजित फेऱ्यांव्यतिरिक्त मंत्रालय आणि इतर ठिकाणांसाठी 22 बसच्या 100 फेऱ्या वाढवण्याचा निर्णय एसटी प्रशासनाने घेतला आहे. 

ही बातमी वाचली का? 'वर्क फ्रॉम होम'मुळे दुधाच्या मागणीत दुपटीने वाढ

कोरोनामुळे रुतलेले अर्थचक्र हळूहळू रुळावर आणण्यासाठी राज्य सरकारने सोमवारपासून संचारबंदी थोडी शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मंत्रालयात किमान 30 टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्या अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत; मात्र आता सरकारच्या नव्या अधिसूचनेमुळे मंत्रालयातील कर्मचाऱ्यांची वाढ होणार आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्यांमध्येसुद्धा वाढ करण्यात येणार आहे. 

ही बातमी वाचली का? झाला खुलासा, असा घुसला भारतीय नौदलात कोरोना
 

अशा सुटणार बस 

मुंबई विभाग 
      पासून - पर्यंत - फेऱ्या 

 • पनवेल - मंत्रालय - 6 
 • मंत्रालय - पनवेल - 6 

ठाणे विभाग 

 • आसनगाव - मंत्रालय - 2 
 • मंत्रालय - आसनगाव - 2 
 • बदलापूर - मंत्रालय - 5 
 • मंत्रालय - बदलापूर - 5 
 • डोंबिवली - मंत्रालय - 5 
 • मंत्रालय - डोंबिवली - 5 
 • कल्याण - मंत्रालय - 5 
 • मंत्रालय - कल्याण - 5 
 • शहापूर - मंत्रालय - 3 
 • मंत्रालय - शहापूर - 3 
 • मिरा रोड - मंत्रालय - 3 
 • मंत्रालय - मिरा रोड - 3 

  ही बातमी वाचली का? दिव्यांगाचे बाणेदार उत्तर... माझ्यापेक्षा गरिबांना मदत करा

  पालघर विभाग 

 • विरार - मंत्रालय - 5 
 • मंत्रालय- विरार - 5 
 • पालघर - मंत्रालय - 5 
 • मंत्रालय - पालघर - 5 
 • वसई - मंत्रालय - 5 
 • मंत्रालय - वसई - 5 
 • नालासोपारा - मंत्रालय - 5 
 • मंत्रालय - नालासोपारा - 5 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Additional rounds of ST for mantralaya Tuesday