salman khan fireing update
salman khan fireing update sakal
मुंबई

Salman Khan: सलमान खान गोळीबार प्रकरणी आणखी 2 आरोपी मुंबई विमानतळावरून अटकेत

सकाळ वृत्तसेवा

Mumbai Crime: सलमान खान घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणी पोलिसांनी 2 संशयितांना बुधवारी मुंबई विमानतळावर अटक केली आहे.तुशार काळे, सचिन पोटे अशी अटक आरोपींची नाव असून दोघेही पुण्याचे रहिवासी असल्याची माहिती मिळत आहे. (tushar kale and sachin pote arrested in mumbai airport )

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन आरोपींना या दोघांनी मदत केल्याचा आरोप आहे. मंगळवारी पोलिसांनी गुजरातमधून गोळीबार करणाऱ्या 2 आरोपीना अटक करण्यात आली होती. त्या पार्श्भूमीवर या दोघां आरोपींना अटक करण्यात आली आहे.

शूटर अटकेत

अभिनेता सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंबाहेर रविवारी दोन जणांनी गोळीबार केला होता. या प्रकरणी दोन आरोपींना सोमवारी रात्री गुजरातमधील भुज येथून अटक करण्यात आले. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी दोघा आरोपीची नावे आहेत.

मुंबई पोलिसांनी या दोघांना आज न्यायालयात हजर केले असता, दोघांनाही 25 एप्रिलपर्यंत म्हणजेच 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विकी गुप्ता आणि सागर श्रीजोगेंद्र पाल मूळचे बिहारमधील पश्चिम चंपारणचे रहिवासी आहे. (Vicky Gupta and Sagar Srijogendra )

बिश्नोई टोळी कनेक्शन

सलमान खानच्या निवासस्थानाबाहेर 2 व्यक्तीपैकी एक आरोपी सागर पाल हा बाईक चालवत होता तर मागे बसलेल्या विकी गुप्ताने सलमानच्या घराबाहेर गोळीबार केला. हे दोघेही दोन वर्षांपासून बिश्नोई गँगसाठी काम करत होते.

आरोपींनी घटनेपूर्वी तीन वेळा सलमान खानच्या घराची रेकी केली होती. दोन्ही गोळीबार करणाऱ्यांनी पाच राऊंड फायर केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (salman khan home firing)

अनमोलच्या निर्देशानुसार गोळीबार

गोळीबारानंतर अनमोल बिश्नोई याने या घटनेबाबत फेसबुकवर एक पोस्टही लिहिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनमोल बिश्नोई हा तुरुंगात बंद गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा धाकटा भाऊ आहे.लॉरेन्सचा धाकटा भाऊ अनमोल याच्या सांगण्यावरून राजस्थानचा गँगस्टर रोहित गोदारा याने सलमानच्या घराबाहेर गोळीबार करण्याचे काम या दोघांना दिले होते. या दोघांचाही थेट अनमोलशी संबंध आहे.(anmol bishnoi)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: नवी मुंबई पोलीस आयुक्तांकडून मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आढावा

Navi Mumbai News: 13 वर्षाच्या मुलाने पॉर्न पाहून अल्पवयीन बहिणीला केलं गरोदर, पनवेलमधील धक्कादायक घटना

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: जावेद अख्तर, शबाना आझमींनी मुंबईत केले मतदान

Deepthi Jeevanji : भारत की बेटी सब पर भारी... दीप्तीने जपानमध्ये रचला इतिहास! 400 मीटर T20 शर्यतीत जिंकले 'गोल्ड मेडल'

IPL 2024: ECB ने निर्णय बदलला... हंगाम संपण्यापूर्वीच इंग्लिश खेळाडू परत जाण्याबाबत पंजाब किंग्सच्या कोचचा खुलासा

SCROLL FOR NEXT