मुंबई

वांद्रे येथे झोपडपट्टीला भीषण आग 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : वांद्रे येथील नर्गीस दत्त नगरमधील लालमाती परिसरातील झोपडपट्टीला मंगळवारी भीषण आग लागली. बंद घरातील सिलिंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे समजते. त्यानंतर इतर घरांतही सात सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग आणखी भडकली. त्यानंतर आगीबरोबरच धुराचे लोटच्या लोट उसळले. या परिसरात दाटीवाटीने दोन ते तीन मजली झोपड्या असल्यामुळे अग्निशमन दलाला आग नियंत्रणात आणण्यात अडथळा येत होता. या आगीत 80 झोपड्या खाक झाल्या; तर चार जण जखमी झाले आहेत. 

लालमाती परिसरातील म्हाडाच्या जमिनीवर ही झोपडपट्टी आहे. या झोपडपट्टीला आग लागल्याची माहिती सकाळी 11 वाजता अग्निशमन दलाला मिळाली. त्यानंतर तातडीने पाण्याचे 10 टॅंकर, 12 फायर इंजिन घटनास्थळी दाखल झाले. एकामागोमाग सिलिंडर स्फोटांमुळे आग आणखी भडकली. तसेच आगीच्या लोळांसोबतच धुराचे लोटही उसळत होते. अशा स्थितीत झोपड्यांची दाटीवाटी असलेल्या या परिसरात आग विझवितना अग्निशमन दलाला मोठ्या अडचणींचा सामाना करावा लागत होता. त्यासाठी अग्निशमन दलाच्या 50 जवानांसह पोलिस झटत होते. अखेर सायंकाळी 5 वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. दरम्यान, आग लागली तेव्हा एका झोपडीत दोन मुले अडकली होती. धुरामुळे ही मुले गुदमरली. हे अग्निशमन दलाच्या वेळीच लक्षात आल्याने त्यांना वाचवण्यात आले. सैफउद्दीन (वय 2) आणि उमेरा खातून (7) अशी त्यांची नावे असून दोन महिलाही किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर वांद्रे येथील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या आगीत अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. 

संशयाचा धूर 
आग लागलेल्या झोपडपट्टीच्या पुनर्विकासाचा प्रश्‍न अनेक वर्षे प्रलंबित आहे. झोपडपट्टीत दोन ते तीन मजली घरे आहेत. त्यामुळे ही आग लागली की मुद्दाम लावण्यात आली, असा संशय व्यक्त केला जात आहे. 2004 पासून या ठिकाणी सात ते आठ वेळा आग लागली आहे. दीड वर्षातील ही आगीची तिसरी घटना आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: शरद पवारांच्या ताफ्यातील गाड्या एकमेकांना धडकल्या, मोठा अनर्थ टळला!

T20 World Cup 2024: ICC ची मोठी घोषणा! वर्ल्ड कपसाठी अंपायर अन् मॅच रेफ्रींची झाली निवड, पाहा संपूर्ण यादी

Arvind Kejriwal: "....म्हणून आम्ही केजरीवालांच्या जामिनाचा विचार करु शकतो"; सुप्रीम कोर्टाचा ईडीला इशारा

Sobita Dhulipala :"हो मी प्रेमात आहे" ; शोबिताने दिली नागा चैतन्यवरील प्रेमाची कबुली ?

OpenAI लाँच करणार गुगलला टक्कर देणारं सर्च इंजिन! जाणून घ्या काय असेल खास?

SCROLL FOR NEXT