Shiv Sainik aggressive Mumbai Police deployed 4 striking forces shiv sena sanjay raut ed case mumbai
Shiv Sainik aggressive Mumbai Police deployed 4 striking forces shiv sena sanjay raut ed case mumbai sakal
मुंबई

Sanjay Raut ED : शिवसैनिक आक्रमक...मुंबई पोलिसांची 4 स्ट्रायकिंग फोर्स तैनात

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यावर शिवसैनिक आक्रमक झाले होते. रविवारी ईडीच्या झडतीदरम्यान शिवसैनिक मोठ्या संख्येने राऊत यांच्या निवासस्थानाबाहेर तसेच इडी कार्यालय बाहेर कारवाई विरोधात निदर्शने केली. मुंबई पोलिसांनी परिस्थिती लक्षात घेता एकूण पोलिसांची 4 स्ट्रायकिंग फोर्स पथके तयार केली . त्यात 2 पोलिसांची पथके ईडी कार्यालय बाहेर 1 जेजे रुग्णालय आणि एक पथक मुंबई सत्र न्यायालयात तैनात करण्यात आले. मुंबई पोलीसांचे वरिष्ठ अधिकारी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून परिस्थिती हाताळताना दिसले. मुंबई पोलीस उपायुक्त डॉ. हरी बालाजी सत्र न्यायालय परिसरात सुरक्षेचा आढावा घेत होते. मुंबईत तीन ठिकाणी बंदोबस्त कडेकोट करण्यात आला होता. दक्षिण मुंबईतील इडी कार्यलय , जेजे रुग्णालय आणि मुंबई सत्र न्यायालय या तीन ठिकाणी जवळपास 200 पोलीस तैनात करण्यात आले होते.

संजय राऊत याच्यावर कारवाई सुरू झाल्यावर शिवसैनिक आक्रमक झाले होते. रविवारी संजय राऊत यांचे भांडुप मधील घर तसेच इडी कार्यालय येथे शिवसैनिक जमा झाले होते . कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी 100 पोलीसांचे कर्मचारी ईडी कार्यालय बाहेर सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले .तसेच संजय राऊत यांची आरोग्य चाचणी जेजे रुग्णालयात करण्यात येणार आली. 50 पोलीसांचे जवान जेजे रुग्णालयाबाहेर सुरक्षा करत होते. संजय राऊत यांना सोमवारी मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यापूर्वी न्यायालया बाहेर कडेकोट सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मुंबई सत्र न्यायालय संजय राऊत याना हजर करण्यात आले तेव्हा परिसरात सुध्दा शिवसैनिक पोहोचले होते. जवळपास 50 पोलीस सत्र न्यायालयाबाहेर तैनात करण्यात आले होते.

अतिरिक्त बळाची तैनाती.

मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागात असलेल्या ईडी कार्यालयात मोठ्या प्रमाणात राज्य राखीव पोलीस दलाचे जवान तैनात करण्यात आले होते. इडी कार्यालय जवळ सुद्धा शिवसैनिकानी गर्दी करायला सुरुवात केली परंतु परिसरातील इडी कार्यालयाकडे जाणारे रस्ते वाहनांसाठी बंद करण्यात आले तसेच रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी राज्य राखीव पोलीस दलाच्या 2 तुकड्या केंद्र राखीव दलाची 1 तुकडी तसेच स्थानिक पोलिसांचे 35 कर्मचारी तैनात करण्यात आले होते. पोलीस उपायुक्त बालाजी स्वतः घटनास्थळी राहून परिस्थिती हाताळत होते.इडी कार्यालयाला जणू छावणीचे स्वरूप आले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT