0Shivsena_logo.jpg
0Shivsena_logo.jpg 
मुंबई

तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी : शिवसेना

नेताजी नलवडे

वाशी : तालुका दुष्काळग्रस्त जाहिर करण्याची मागणी तालुका शिवसेनेच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देऊन बुधवार (ता.२६ ) ला करण्यात आली आहे. मागणीचे निवेदन तहसिलदार डॉ संदिप राजपुरे यांनी स्विकारले आहे. यावेळी नायब तहसिलदार सुरेंद्र डोके यांची उपस्थित होते.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हवामान विभागाने यावर्षी चांगला पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवली होती. जुनच्या सुरवातीला पावसाने तालुक्यात हजेरी लावली पेरणीयोग्य जमिनीत ओल झाल्यानतंर शेतकऱ्यांनी पेरणी ऊरकुण घेतली. माञ पेरणी नतंर आजपर्यत पावसाने मोठा खंड दिल्याने शेतक-यांची पिके करपुन गेलेली आहेत. तालुक्यात अत्यल्प पाऊस झालेला असुन आजपर्यतच्या झालेल्या पावसामध्ये एकदाही जमिनीच्या बाहेर पाणी निघालेले नाही.

शासनाच्या धोरणानुसार पंधरा ऑगस्ट पर्यत सरासरीच्या प्रमाणात पाऊस नाही पडल्यास व सरासरी उत्पन्न कमी आल्यास दुष्काळ जाहीर करणे बाबतची कार्यवाही सुरु होणे आवश्यक आहे. सद्यपरिस्थितीमध्ये सप्टेंबर महिना संपलेला असुन नैसर्गिक पावसाळाही संपला आहे. अपुऱ्या पाऊसामुळे खरिपाची पिके गेलेली आहेत. रब्बी हंगामाची पेरणीही अवकाळी पावसावर अवलंबुन आहे. पावसाअभावी जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार असल्यामुळे त्याबाबत आतापासुनच उपाय योजना करणे आवश्यक आहे. खरिपाची पिके शेतकऱ्यांच्या हातुन गेलेली असल्याने शेतकरी अडचणीत आलेले आहेत. रब्बी हंगामाची पेरणीसाठी आर्थिक तरतुद नाही अशा परिस्थितीत लवकरात लवकर उपाय योजना नाही केल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तात्काळ योग्य तो चौकशी अवहाल तयार करुन शासनाकडे सादर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

निवेदनावर तालुका प्रमुख डॉ.सत्यवान गपाट युवा सेना तालुका प्रमुख बाळासाहेब मांगले जि.प.सदस्य उद्धव साळवे, शहरप्रमुख सतिष शेरकर विकास तळेकर नानासाहेब कवडे उपशहरप्रमुख बाळासाहेब मोळवणे युवा सेना शहरप्रमुख लायक तांबोळी रविंद्र धर्माधिकारी विभाग प्रमुख तात्या गायकवाड श्रीराम घुले गण प्रमुख दशरथ नाळपे सरमकुंडी सरपंच दिनकर शिंदे, तांदुळवाडी सरपंच दत्तात्रय चौधरी, बंडु मुळे, हरीभाऊ गावडे, प्रविण गायकवाड, डॉ.नितीन पवार, अविनाश चेडे, अमित गपाट, नितीन कदम,काका पौळ, संदिप घुले निलेश नकाते, ओम माळी, योगेश चोपडे. अतुल मस्के, बापूसाहेब थोरबोले, दयानंद कवडे, शेषराव ढवळे, शिवाजी कवडे, सौदागर माने,  ऋषिकेश पारडे, आदिंच्या स्वाक्ष-या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT