मुंबई

मेंदूत कचरा साचला म्हणणाऱ्या संजय राऊतांनीच केला 'साफ'

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावरील 'ठाकरे' या चित्रपटाचा प्रीमियरवेळी शिवसेना खासदार संजय राऊत आणि दिग्दर्शक अभिजीत पानसे यांच्यातील मानपमान नाट्यानंतर राऊत यांनी एक सूचक ट्विट करत लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला असे ट्विट केल्यानंतर काही वेळातच ते हटविल्याचे दिसत आहे.

'ठाकरे' चित्रपटाचा प्रिमियर बुधवारी सायंकाळी वरळी येथे ठेवण्यात आला होता. चित्रपटाच्या स्क्रिनिंगवेळी चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत पानसे मधूनच निघून गेले. निर्माते-खासदार संजय राऊत यांनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण पानसे चित्रपट न पाहताच तिथून निघाले. त्यामुळे या चित्रपटाच्या प्रीमियरवेळी मान-अपमानाचे नाट्य पाहायला मिळाले. यानंतर राऊत यांनी ट्विट करत लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. हाच ठाकरे चित्रपटाचा संदेश आहे, असे म्हटले होते. मात्र, काही वेळातच ते ट्विट डिलीट केल्याचे दिसत आहे.

या स्क्रिनिंगला राजकारणातील अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाचे स्क्रिनिंग दिग्दर्शक अभिजीत पानसे येण्याआधीच सुरू करण्यात आले. पानसे यांना निर्माते संजय राऊत आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबरीने पहिल्या रांगेत बसविणे अपेक्षित होते. मात्र पानसे चित्रपटगृहात आल्यानंतर त्यांना व त्यांच्या बरोबरीच्या मंडळींना बसण्यासाठी योग्य जागा न ठेवल्याने ते नाराज होऊन निघाले. यावेळी राऊत यांनी पानसे यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण पानसे चित्रपटगृहाबाहेर पडले. "या चित्रपटाचा दिग्दर्शक या नात्याने मला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि निर्माते संजय राऊत यांच्याबरोबरीने बसवण्याची अपेक्षा होती. माझ्याबरोबर काही मंडळी होती. त्यांचीही बैठक व्यवस्था नीट केली नव्हती. असा अपमान दरवेळी सहन करून घेणार नाही,' अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

दरम्यान, चित्रपटाच्या प्रमोशनमधूनही पानसे यांना डावल्याची चर्चा होती. चित्रपटाच्या म्युझिक लॉंचच्या वेळीही पानसे अनुपस्थित होते. तेव्हा राऊत यांना पानसे म्युझिक लॉंचला उपस्थित का नाहीत? असा प्रश्‍न विचारण्यात आला होता. तेव्हा ते "ठाकरे'च्याच मराठी डबिंगमध्ये व्यस्त असल्याचे राऊत यांनी सांगितले होते. तेव्हापासूनच या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याचे बोलले जात होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT