मुंबई

अन्वय नाईक मृत्यूप्रकरणी 'सीआयडी' चौकशीची माहिती द्या शिवसेना आमदाराचे गृहराज्यमंत्र्यांना पत्र

राहुल क्षीरसागर

ठाणे  : मुंबईतील मराठी आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा 2018 मध्ये अलिबाग येथे मृत्यू झाला. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल असून एक सुसाईड नोट देखील घटनास्थळी सापडली होती. तसेच या प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशीचे आदेश देखील देण्यात आले. परंतु, अद्यापही योग्य ती कारवाई झाली नसल्याचे दिसून येत असून नाईक कुटुंबीय न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. त्यामुळे नाईक आत्महत्येप्रकरणी करण्यात येत असलेल्या सीआयडी चौकशीची माहिती मिळावी, अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

5 मे 2018 ला मौजे कावीर, ता. अलिबाग येथे आर्किटेक्ट अन्वय नाईक व त्यांच्या आई कुमुद नाईक यांचा त्यांच्या राहत्या घरी मृत्यू झाला होता. या प्रकरणी त्यांच्या पत्नीच्या वतीने प्रथम खबर अहवाल (FIR) पोलिसात देण्यात आला होता. या प्रकरणाची 'सुसाईड नोट' पोलिसांना प्राप्त झाली असून या प्रकरणी रितसर गुन्हाही दाखल झालेला आहे. मे महिन्यात अन्वय नाईकच्या पत्नीने व मुलीने या प्रकरणाच्या तपासाबाबत गृहराज्य मंत्री शंभूराजे देसाई यांची भेट घेतली. त्यावेळी 26 मे 2020 रोजी एक ट्विट करून अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची सीआयडीने चौकशीचे पुनर्आदेश देण्यात आल्याचे घोषित केले होते. 

ज्या पद्धतीने सुशांत सिंग राजपूत प्रकरणाची माहिती प्रसार माध्यमाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचत असते तशीच माहिती गृहमंत्री या नात्याने अन्वय नाईक प्रकरणाची माहिती जनतेला प्रसार माध्यमातून मिळते, अगदी तशीच अन्वय नाईक प्रकरणाची सीआयडीची चौकशी पूर्ण झाली का? झाली असेल तर तपासाची सद्यस्थिती काय आहे? याची माहिती सर्वसामान्य जनतेला मिळणे गरजेचे असल्याचे आमदार सरनाईक यांनी पत्रातून म्हटले आहे.

---------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT