खोपोली : मुख्‍याधिकार्!यांना निवेदन देताना खोपोली शहर शिवसेना महिला आघाडीच्‍या पदाधिकारी.
खोपोली : मुख्‍याधिकार्!यांना निवेदन देताना खोपोली शहर शिवसेना महिला आघाडीच्‍या पदाधिकारी. 
मुंबई

खोपोलीमध्‍ये करआकारणीला शिवसेनेचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

खोपोली (बातमीदार) : स्वच्छता अभियानांतर्गत घनकचरा संकलनाच्या नावाखाली खोपोली नगरपालिकेकडून आकारण्यात येत असलेल्या अतिरिक्त कराला खोपोलीत तीव्र विरोध होत आहे. काँग्रेसनंतर आता खोपोली शहर शिवसेनेकडूनही या करआकारणीला विरोध करण्यात आला आहे. या संदर्भात खोपोली शहर शिवसेना महिला आघाडीकडून मुख्याधिकारी गणेश शेटे यांना विरोधाचे निवेदन देण्यात आले.

राज्य सरकारच्या आदेशानुसार नगरपालिकेकडून स्वच्छता अभियानांतर्गत नगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता करासोबत सरसकट अतिरिक्त घनकचरा संकलन कर आकारला जात आहे. खोपोली नगरपालिकेकडून या अंतर्गत अतिरिक्त कराची मागणी बिले सर्व मालमत्ताधारकांना देण्यात येत आहेत. या अतिरिक्त करवसुलीला सर्व स्तरांतून तीव्र विरोध होत आहे. त्याची दखल घेत काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेकडूनही विरोधाची भूमिका घेण्यात आली आहे. सोमवारी (ता. ११) खोपोली शहर शिवसेना महिला आघाडी संघटक प्रमुख व माजी नगरसेविका प्रिया जाधव व सुरेखा खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना महिला आघाडीकडून खोपोली नगरपालिकेला कचरा संकलन अतिरिक्त कराला विरोध असल्याचे निवेदन देण्यात आले. या निवेदनात आकारलेला अतिरिक्त कर तातडीने स्थगित करावा, शहरातील स्वच्छता मोहीम सुरळीत राबवावी, रस्त्यांची तातडीने डागडुजी करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

खोपोली नगरपालिकेकडून तातडीने यासंबंधी सकारात्मक निर्णय न झाल्यास शिवसेना महिला आघाडीकडून उपोषण, मोर्चा यांसारखी आंदोलने नगरपालिकेच्या विरोधात केली जातील, असा इशाराही या निवेदनात देण्यात आला आहे. मुख्याधिकारी शेटे यांनी हे निवेदन स्वीकारले आले. हा अतिरिक्त कर नगरपालिकेकडून नाही, तर राज्य सरकारच्या आदेशाचे पालन व अंमलबजावणी करण्यासाठी आकारण्यात येत असल्याचे या वेळी त्यांनी स्पष्ट केले. तरीही लोकभावना लक्षात घेता, याबाबत योग्य तो धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासन मुख्याधिकारी शेटे यांनी शिवसेना शिष्टमंडळाला दिले आहे. या वेळी उपनगराध्यक्षा विनीता कांबळे-औटी, आरोग्य सभापती प्रमिला सुर्वे या पदाधिकारीही उपस्थित होत्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime News : पुण्यात सशस्त्र दरोडा! सात जणांनी लुटलं सोन्याचं दुकान; 'एवढा' मुद्देमाल लंपास

Thoda Tuza Thoda Maza : शिवानीसोबत 'या' अभिनेत्याचाही स्टार प्रवाहवर कमबॅक

DK Shivkumar: डीके शिवकुमार, 100 कोटी अन् भाजप नेता; प्रज्वल रेवन्ना व्हिडिओ प्रकरणातील नवी घडामोड आली समोर

Latest Marathi News Live Update : मनमोहन सिंग, हमीद अन्सारी यांनी घरातूनच केलं मतदान

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

SCROLL FOR NEXT