Arvind-Sawant
Arvind-Sawant 
मुंबई

शिवसेनेला पुन्हा ‘अवजड’चे ओझे

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील (एनडीए) प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या पदरी १८ खासदार असतानाही पुन्हा निराशा पडली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या अरविंद सावंत यांचा केंद्रीय मंत्री म्हणून समावेश करण्यात आला असला तरी, खातेवाटपात शिवसेनेला अवजड उद्योग हे नेहमीचेच खाते देण्यात आले आहे. यापूर्वीही मनोहर जोशी, अनंत गीते यांनी सांभाळलेले अवजड उद्योग खाते आता सावंत यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. यामुळे खातेवाटपात शिवसेनेचा अपेक्षाभंगच झाल्याची चर्चा आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांवर जोरदार टीका करणाऱ्या शिवसेना-भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी युती केली. सर्व आलबेल झाल्याने शिवसेनेला केंद्रात वजनदार मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा होती. शिवसेनेला केंद्रात यापूर्वी दोन वेळा अवजड उद्योग खाते मिळाले होते. शिवसेना मात्र या खात्यावर कधीच खूश नव्हती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी या खात्याविषयी बोलताना अवजड उद्योग खाते म्हणजे ‘अवजड जागेवरील दुखणे’ असल्याचे अनेकदा बोलून दाखवले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाही हे खाते फारसे रुचलेले नाही. त्यांना अवजड उद्योग खाते सोडून रेल्वे, नागरी विमान वाहतूक, उद्योग खाती मिळावीत, ही अपेक्षा होती. मात्र, आता सावंत यांना नाइलाजाने या खात्याचा कारभार हाकावा लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT