Shivsena leader Vijay Mane will supports Manda Mhatre
Shivsena leader Vijay Mane will supports Manda Mhatre  
मुंबई

शिवसेनेचे शहरप्रमुख विजय मानेंची बंडखोरी म्यान; मंदा म्हात्रेंना पाठिंबा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : बेलापूर विधानसभा मतदार संघाची जागा शिवसेनेच्या वाट्याला न आल्यामुळे महायुतीविरोधात बंडाचा झेंडा उगारणारे शिवसेनेचे शहरप्रमुख विजय माने यांची तलवार अखेर म्यान झाली आहे. सोमवारी पत्रकार परिषदत घेत माने यांनी आपण यापुढे भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा प्रचार करणार असल्याचे स्पष्ट केले.

माने यांची बंडखोरी मोडीत काढण्यात म्हात्रे यांना यश आल्यामुळे बेलापूर मतदार संघातील शिवसेनेतील रुसवे-फुगवेही संपले आहेत. 
राज्य भरातील जागा वाटपांचा फॉर्म्युला ठरवताना शिवसेनेने नवी मुंबईतील बेलापूर मतदार संघावर दावा केला होता. परंतू बेलापूर मतदार संघात भाजपचा स्थानिक आमदार असल्यामुळे भाजपने हा मतदार संघ देण्यास नकार दिला. तर ऐरोली मतदार संघात भाजपवासी झालेल्या नाईक कुटुंबियांपैकी कोणीही एक जण उभा राहणार असल्याने ही जागाही शिवसेनेला मिळाली नाही.

नवी मुंबईत शिवसेनेची ताकद असतानाही तिकीट न मिळाल्याने विजय माने यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरून पक्षाविरोधात बंडखोरी केली होती. मात्र वारंवार सांगूनही माने उमेदवारी मागे घेत नसल्यामुळे मानेंना हाकालपट्टी करण्याचा इशारा पक्षातर्फे देण्यात आला होता. तसेच ठाण्यातील नेत्यांनी मानेंची मनधरणी करीत उगीच कारवाई होईल याचे गांभीर्य मानेंना पटवून दिले होते. त्यामुळे अखेर माने यांनी वडार भवन येथे पत्रकार परिषद घेत मंदा म्हात्रे यांना पाठींबा जाहीर केला. या प्रसंगी उमेदवार मंदा म्हात्रे, शिवसेनेचे विरोधीपक्ष नेते व वडार समन्वय समितीचे अध्यक्ष विजय चौगुले आणि नगरसेवक उपस्थित होते. माने यांनी म्हात्रे यांना पाठींबा जाहीर केल्यामुळे शिवसेनेच्या मतांचे विभाजन टळणार असल्याने म्हात्रेंच्या मताधिक्‍यात वाढ होणार आहे. परंतू जे शिवसेनेचे कार्यकर्ते म्हात्रे यांच्या विरोधात काम करणार आहेत त्यांच्यावर कठोर कारवाईचे संकेत शिवसेनेकडून मिळत आहेत. 

पक्षाची ताकद असूनही आम्हाला उमेदवारी न दिल्याच्या नाराजीतून अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता. मात्र आता ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे विरोधीपक्षनेते विजय चौगुले यांनी माझी मनधरणी केल्याने, तसेच पक्षाचे व माझ्या राजकीय कारकिर्दीचे नुकसान होऊ नये म्हणून मंदा म्हात्रेंना जाहीर पाठींबा देत आहे. यापूढे म्हात्रेंचा प्रचार करणार 
विजय माने, शहरप्रमुख 

शहर प्रमुख विजय माने यांनी बंडखोरी करून माझ्या विरोधात उभे राहीले तेव्हा मी त्यांना कधी कमी लेखले नव्हते. परंतू त्यांच्यामुळे आपल्याच मित्रपक्षातील कार्यकर्ते विरोधात काम करतात ही भावना मनाला पटत नव्हती. परंतू अखेर मानेंनी अर्ज मागे घेतल्यामुळे आता सर्व शिवसैनिक व भाजपचे कार्यकर्ते एकत्रितरित्या निवडणूकीच्या कामाला लागतील. 
मंदा म्हात्रे, आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT