मुंबई

शिवसेना आवळणार‘हिंदुत्वाची वज्रमूठ’?

संजय मिस्कीन

मुंबई - चार वर्षे सत्तेत राहून विरोधाची धार कायम ठेवणाऱ्या शिवसेनेने यंदाच्या दसरा मेळाव्यातून प्रतिस्पर्धी भाजपला शह देण्याची तयारी केली आहे. उद्या (ता. १८) ‘शिवतीर्था’वरील दसरा मेळाव्याला पाच लाख शिवसैनिक जमा करण्याचे लक्ष्य ठरवून देण्यात आले असून, गावखेड्यांतून त्याची तयारी करण्यात आली आहे. ‘वज्रमूठ हिंदुत्वाची’ असे या दसरा मेळाव्याचे घोषवाक्‍य ठरवत भारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्वाला आव्हान देण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करणार असल्याचे मानले जात आहे. 

राम मंदिर उभारणीचा मुद्दा ऐरणीवर आलेला असताना ‘चलो अयोध्या’ असा नारा देत उद्धव ठाकरे हे ‘मिशन अयोध्या’ची घोषणा या वेळी करतील अशी शक्‍यता वर्तविली जात आहे. 

अयोध्येला जाऊन थेट राम मंदिराच्या उभारणीची वीटच रचण्याची प्रतिज्ञा या मेळाव्यातून शिवसेना करेल, असे अंदाज बांधले जात आहेत. त्यामुळे, उद्याचा दसरा मेळावा हा शिवसेनेच्या भाजपविरोधातल्या निर्णायक संघर्षाची नांदी ठरेल, असा दावा करण्यात येत आहे. या मेळाव्यासाठी पहिल्यांदाच शिवसेनेने अत्यंत सूत्रबद्ध आखणी केली आहे. प्रत्येक तालुक्‍यातील नेत्यांना त्यासाठी कामाला लावण्यात आले आहे.

ताकद दाखवणारच
यंदाच्या दसरा मेळाव्यात ‘आता ताकद दाखवणारच’ असा निर्धार उद्धव ठाकरे यांनी केला आहे. त्यासाठी गर्दीचा उच्चांक व्हावा यासाठी नेत्यांना तंबीदेखील देण्यात आली आहे. पाच लाखांची गर्दी करत भाजपवर राजकीय दबावतंत्राचा वापर करण्याचे शिवसेनेने डावपेच आखल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT