Shweta Tiwari s Daughter Palak Tiwari shares post on father Abhinav Kohli s behavior
Shweta Tiwari s Daughter Palak Tiwari shares post on father Abhinav Kohli s behavior 
मुंबई

वडिलांनी अनेकदा अश्लिल भाषा वापरली; श्वेता तिवारीच्या मुलीची पोस्ट व्हायरल

वृत्तसंस्था

मुंबई : टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीने पती अभिनव कोहलीवर घरगुती हिंसाचाराचा आरोप केला. यानंतर आता श्वेताची मुलगी पलक हिने सोशल मीडियावर पोस्ट लिहित तिचे सावत्रन वडील तिच्यावरही अत्याचार करायचे याबाब माहिती दिली आहे. 

श्वेताने तक्रार दाखल करताना पलकलाही तो त्रास देतो असे सांगितले होते. यावेळी पलकही पोलिस स्टेशनबाहेर रडताना दिसली होती.  स्पॉटबॉयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, अभिनव पत्नी श्वेता आणि पलकसोबत वाईट वागायचा. जेव्हा अभिनवने कोणताही विचार न करता मारहाण करायला सुरुवात केली तेव्हा श्वेताने हे प्रकरण पोलिसांपर्यंत नेण्याचं ठरवलं.

श्वेताची मुलगी पलक तिवारी हिनं या प्रकरणावर आपली प्रतिक्रीया दिली आहे. तिनं सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पलक म्हणाली, ‘काही गोष्टी मला स्वत:ला स्पष्ट करून सांगायच्या होत्या, म्हणून मी ही पोस्ट लिहितेय. फक्त बातम्या वाचून एखाद्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कमेंट करणं खूप सोपं असतं पण त्यांच्या आयुष्यात खरं काय घडलंय हे कोणालाच जाणून घ्यायचं नसतं. माझ्या आईने काय सहन केलं आहे हे माझ्यापेक्षा चांगलं कोणालाच माहित नाही. त्यामुळे या घटनांबाबत माझं मत सर्वांत अधिक महत्त्वाचं ठरतं,’ असं तिने लिहिलं.

अभिनव कोहलीने पलकला मारहाण केल्याच्या वृत्ताला फेटाळत तिने पुढे लिहिलं, ‘अभिनव कोहलीने माझा शारीरिक छळ कधीच केला नव्हता ना मला त्याने कधी अनुचित प्रकारे स्पर्श केला. मात्र त्याने अनेकदा माझ्यासाठी अश्लील भाषा वापरली. कोणत्याही महिलेने असे शब्द ऐकले असते तर तिलाही त्याची लाज वाटली असती. असे शब्द, अशी भाषा जे एका स्त्रीच्या सन्मानाबद्दल प्रश्न उपस्थित करतील, असे शब्द जे एखाद्या महिलेला कोणत्याच पुरूषाकडून अपेक्षित नसतील, वडिलांकडून तर नक्कीच नाही. सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमधून आमच्या आयुष्यातील संघर्षाबद्दल वाचणं खूप सोपं आहे. मुलगी म्हणून गर्वाने सांगू इच्छिते की माझी आई ही माझ्यासाठी सर्वांत आदरणीय व्यक्ती आहे. ती आज जे काही आहे ते तिने स्वकर्तृत्वाने मिळवलं असून आयुष्यात कधीच तिला त्यासाठी पुरुषाची गरज लागली आहे.’

मुंबईच्या समता नगर पोलिस ठाण्यात ही तक्रार नोंदवण्यात आली असून सध्या पोलिसांनी अभिनवला अटक केली असून. कौटुंबिक हिंसाचारामुळे श्वेताला दुसऱ्यांदा पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनव, पलकवर अश्लील कमेंट करायचा. श्वेताने आपल्या तक्रारीत म्हटलं की, 2017 मध्ये अभिनवने पलकला त्याच्या मोबाइलमध्ये एका मॉडेलचा अश्लिल फोटो दाखवला होता. श्वेताच्या तक्रारीनंतर पोलिसांनी चार तास अभिनवची चौकशी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT