Simulation lab system will now result in surgery errors
Simulation lab system will now result in surgery errors 
मुंबई

'सिम्युलेशन लॅब यंत्रणे'मुळे शस्त्रक्रियेतील चुका आता टळणार

नेत्वा धुरी

मुंबई : रुग्णांवर प्रथमच शस्त्रक्रिया करताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी शिकाऊ डॉक्‍टरांतर्फे आता यंत्रावर (सिम्युलेशन लॅब) शस्त्रक्रिया केली जाणार आहे. मुंबई महापालिकेकडून त्यासाठी अद्ययावत सिम्युलेशन यंत्रणा उभारणी केली जाणार आहे. 

शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात यंत्र आहेत; मात्र त्याआधारे एक मोठी संस्था उभारली जाणार आहे. त्याद्वारे रुग्णांवर उपचार केले जातील. शिकाऊ डॉक्‍टरांना याद्वारे प्रशिक्षण घेता येईल. महापालिकेच्या आरोग्य विभागात याबाबतच्या हालचालींना वेग आल्याची माहिती सूत्रांनी दिली. या सिम्युलेशन लॅबमध्ये एखादी शस्त्रक्रिया केल्यानंतर शरीरावर कशी होईल, हे समोरच्या स्क्रीनवर दिसते. 

टिळक रुग्णालयातील स्त्री रोग विभागात शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान अवगत व्हावे यासाठी यंत्र आणण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अशाप्रकारचे यंत्र आणणारे महापालिकेचे पहिले रुग्णालय आहे. 11 महिन्यांपूर्वी टिळक रुग्णालयात दोन यंत्रे बसवण्यात आली. त्याआधारे स्त्री रोग विभागात नव्याने सिम्युलेशन लॅब उभारली आहे. यात या लेप्रोस्कॉपी, हिस्ट्रोस्कॉपी आणि सोनोग्राफीची अद्ययावत यंत्रणा आहे. यासाठी 3.2 कोटींचा खर्च झाला.

लॅबची उभारणी होत असताना वरिष्ठ आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या लॅबचा विस्तार करण्याचा मनोदय व्यक्त केला. याबाबतची बैठक नुकतीच पार पडली. रुग्णालय प्रशासनाने लॅबचे सादरीकरणही केले. शस्त्रक्रियेदरम्यान होणाऱ्या चुका यामुळे टळतील, अशी शक्‍यता व्यक्त केली जात आहे. 

शिकाऊ डॉक्‍टरांना फायदा 

महापालिकेच्या रुग्णालयांतील शिकाऊ डॉक्‍टरांना याचा फायदा होईल. या यंत्रणेद्वारे केईएम, नायर या वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही सराव करता येईल. 

लॅब उभारणीचे आव्हान 
सिम्युलेशन लॅबच्या उभारणीसाठी जागेची निवड, निविदा प्रक्रिया, यंत्रणांची खरेदी आदी कामे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन पालिकेसमोर आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT