S-K-J.jpg
S-K-J.jpg 
मुंबई

डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी आठवडाभरात विशेष कार्यपद्धती : डॉ. सुबोध जैस्वाल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी मुंबईत आठवड्याभरात विशेष कार्यपद्धती (एसओपी) लागू केली जाईल, अशी घोषणा राज्याचे पोलिस महासंचालक डॉ सुबोध जैस्वाल यांनी केली. वांद्रे येथे आयएमसी सोच या एकदिवसीय परिषदेत डॉक्टरांवरील हिंसा या विषयावर बोलताना त्यांनी ही घोषणा केली.

असोसिएशन फॉर मेडिकल कन्सल्टन्ट (आयएमसी) या खासगी डॉक्टरांच्या संघटनेने या परिषदेचे आयोजन केले होते. डॉक्टरांवरील वाढता अन्याय हा आजही वैद्यकीय क्षेत्रासाठी चिंतेचा विषय आहे. खासगी रुग्णालयांच्या तुलनेत सरकारी रुग्णालयातील कमी मनुष्यबळाचा ताण डॉक्टरांवर येतो, त्यामुळे डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकाकडून मारहाणीला सामोरे जावे लागते, हे संतापजनक असल्याची भूमिका आयएमएचे कायदेशीर विभागाचे सदस्य डॉ सुधीर नाईक यांनी मांडली. दहा वर्षांपूर्वी डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी एकोणीस राज्यात कायदा नावारुपाने आला.

राज्यात महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूशन एण्ड प्रोटेक्शन कायदा दोन हजार नऊ ला लागू होऊनही अद्याप अंमलात आलेला नाही. दहा वर्षांपूर्वी कर्नाटकातही कर्नाटक प्रोटेक्शन ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूशन एण्ड प्रोटेक्शन कायदा दोन हजार नऊ लागू झाला. एकोणीर राज्यात पारित झालेल्या या कायद्यात डॉक्टरांच्या सुरक्षा पुरवण्यासाठी पोलिसांकडून आवश्यक उपाययोजना अंमलात आणल्या जाव्यात,अशी तरतूद आहे. परंतु कित्येकदा पोलिसांना या कायद्याची पूसटशी कल्पनाही नसल्याचा अनुभव आम्हांला येतो, असा मुद्दा डॉ नाईक यांनी मांडला.

माजी न्यायाधीश रबोलो यांनीही या मुद्दा पुढे नेत सरकारी वैद्यकीय क्षेत्रातील अपु-या सोयीसुविधांबाबत नाराजी दर्शवली. कायद्याचे ज्ञान सर्वांना हवे. तसेच डॉक्टरांवरील वाढते हल्ले लक्षात घेत फास्ट ट्रॅक कोर्ट निर्माण करण्याचा मुद्दाही त्यांनी मांडला. आज रुग्णांच्या नातेवाईकांकडून हल्ला झाला तर मुळात केस नोंदणीसाठीच पोलिसांकडून वेळ घेतला जातो, याकडेही लक्ष द्यायला हवे, असा मुद्दा सेंट्रल मार्डच्या डॉ कल्याणी डोंगरे यांनी उपस्थित केला.

फास्ट ट्रॅक केसेसची नोंदणी पोलिसांकडून व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली. यावर पोलिसांमधील डॉक्टरांच्या हल्ल्याविरोधातील सुरक्षेसाठी आवश्यक कार्यपद्धती ही महाराष्ट्र प्रोटेक्शन ऑफ मेडिकल इन्स्टिट्यूशन एण्ड प्रोटेक्शन एक्ट दोन हजार नऊप्रमाणे लवकरच लागू होईल, असे आश्वासन डॉ सुबौध झैस्व्ल यांनी दिली. याची सुरुवाच आठवड्याभरात मुंबईत होईल, त्यानंतर उर्वरित राज्यात सुरु केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले

कार्यपद्धतीतील तरतूदी –

- पोलिसांनी आपापल्या विभागातील रुग्णालयांच्या तसेच डॉक्टरांच्या नोंदी ठेवाव्यात.

- विभागातील डॉक्टरांच्या संपर्कात राहण्यासाठी वॉट्स अप ग्रुपची स्थापना करावी.

- या ग्रुपमधूल डॉक्टरांच्या हल्ल्याची माहिती मिळाली किंवा थेट संपर्क झाला की तातडीने घटनास्थळी दाखल व्हावे

- वैद्यकीय रुग्णालयात गर्दी करणा-यांना आवरणे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT