फ्लेमिंगो दर्शनासाठीच्या बोटसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद
फ्लेमिंगो दर्शनासाठीच्या बोटसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद 
मुंबई

फ्लेमिंगो दर्शनासाठीच्या बोटसेवेला उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा

वाशी : ठाणे खाडी परिसरातील ऐरोली येथे फ्लेमिंगो पक्ष्यांचे आगमन झाले आहे. या पक्ष्यांना जवळून न्याहाळता यावे, यासाठी शुक्रवार (ता.15) पासून बोट सफर ही सेवा सुरू झाली असून, तिला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. फ्लेमिंगो दर्शन करणाऱ्यांसाठी ही एक पर्वणीच ठरत आहे. 

खारफुटी आणि सागरी जैवविविधतेविषयी माहिती देणारा किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्र कांदळवन संरक्षण विभागाने ऐरोली खाडीलगत उभारले आहे. या केंद्रात माहिती देणारी दोन मोठी दालने असून, खेकड्यांची शेती, खाडी निरीक्षण, फ्लेमिंगो दर्शन फेरी असे उपक्रम या ठिकाणी राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून वन विभागाचे उत्पन्नही वाढत आहे. दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या बोट सेवेला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यंदा अवकाळी पावसामुळे फ्लेमिंगो पक्षी खाडीकिनारी येण्यास उशीर झाला. मात्र, सध्या खाडीकिनारी मोठ्या प्रमाणात फ्लेमिंगो पक्षी येण्यास सुरुवात झाली असून, शुक्रवारपासून त्यांना बघण्यासाठी पर्यटकांचा ओढा वाढला आहे. या सागरी जैवविविधता केंद्रात उरण येथे सापडलेल्या ब्ल्यू व्हेल माशाचा सांगडाही ठेवण्यात आला आहे. 

ऐरोली केंद्रातून ठाणे खाडीत सोडल्या जाणाऱ्या बोटींच्या साह्याने पर्यटकांना 10 किलोमीटर खाडी परिसरात विहार करून, फ्लेमिंगोंचे दर्शन घडविले जात आहे. साधारण 45 मिनिटांच्या बोटींगमधून हा विहार केला जात आहे. एका बोटीमध्ये 24 व्यक्तींसाठीची आसनव्यवस्था असून, सध्या अशा दोन बोटी आहेत. यासाठी प्रतिव्यक्ती 300 रुपये शुल्क आकारले जात आहे. शनिवार-रविवारी फेरी शुल्क 400 रुपये आकरण्यात येते. कुटुंब किंवा मित्र-मंडळींसोबत एकत्र फ्लेमिंगो दर्शनाचा आनंद लुटण्यासाठी सात आसनी कौस्तुभ नावाची बोटही या ठिकाणी उपलब्ध आहे. 

ठाणे खाडीमध्ये फ्लेमिंगो पक्षी येण्यास सुरुवात झाल्याने, बोटसेवा सुरू करण्यात आली आहे. या बोटिंग सेवेला पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. 
-एन. जी. कोकरे, कांदळवन क्षेत्र अधिकारी. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT