st buses
st buses 
मुंबई

एसटीची 10 टक्के हंगामी दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

मुंबई  : एसटी महामंडळाने दिवाळीच्या काळात 10 टक्के हंगामी दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. 25 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत ही हंगामी भाडेवाढ सुरू राहणार आहे. 
गर्दीच्या हंगामात महसूल वाढीच्या दृष्टीने 30 टक्‍क्‍यांपर्यंत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानुसार या वर्षीदेखील 10 टक्के भाडेवाढ 24 ऑक्‍टोबरच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे. साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी) व शिवशाही (आसन, शयनयान) बससेवेसाठी 10 टक्के भाडेवाढ लागू आहे; मात्र शिवनेरी व अश्‍वमेध बससेवेला ही भाडेवाढ लागू होणार नाही. हंगामी भाडेवाढ 5 नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले आहे. 

भाडेवाढीचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी ज्या प्रवाशांनी 25 ऑक्‍टोबर ते 5 नोव्हेंबरदरम्यानच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण केले असतील, त्यांना प्रवासावेळी प्रवासभाड्यातील वाढीव रक्कम द्यावी लागेल, अशी माहिती एसटी महामंडळाच्या वतीने देण्यात आली.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT