Dr Aashish Shelar
Dr Aashish Shelar Sakal
मुंबई

भाजप कार्यालयांसमोरील तमाशा थांबवा नाहीतर राज्यभर तांडव होईल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - संयम सगळयांनीच ठेवायला हवा. मुख्यमंत्री पदाबाबत नक्कीच ठेवला पाहिजे, त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली आहे. त्यानंतर सुद्धा झुंडशाही राज्यभर बघतो आहोत. शिवसेनेने (Shivsena) हा तमाशा बंद करावा. भाजप (BJP) कार्यालया समोरील तमाशा बंद थांबवा नाहीतर राज्यभर तांडव होईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही मुख्यमंत्री (Chief Minister) आणि महाविकास आघाडीची राहिल, अशा शब्दांत भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (Aashish Shelar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री नारायण राणें यांच्या अटकेचा आम्ही संपुर्णत निषेध आणि धिक्कार करतो. राज्य सरकारला आणि विशेषत: शिवसेनेला यातला गर्भित इशारा आम्ही देउ इच्छितो,की सुरुवात तुम्ही केलीय शेवट आम्ही करु.ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकरणात राज्य सरकार वागते आहे ते पाहून तालिबानीसुद्धा शरमेने आत्महत्या करतील एवढी झुंडशाही महाविकास आघाडीची लोक करत आहेत. नारायण राणेंच्या वक्तव्याविषयी देवेंद्र फडवीसजींनी पक्षाची भुमिका स्पष्ट केली. संयम सगळयांनीच ठेवायला हवा. मुख्यमंत्री पदाबाबत नक्कीच ठेवला पाहिजे, त्यामुळे संयमाची अपेक्षा पक्षाने स्पष्ट बोलून दाखवली. त्यानंतर सुद्धा झुंडशाही राज्यभर बघतो आहोत. शिवसेनेने हा तमाशा बंद करावा असा इशारा ही शेलार यांनी दिला.

या कारवाई नंतर मंत्री अनिल परब यांची क्लिप सुद्धा बाहेर आलीय. राणे यांनी स्वत सांगितले मी गुन्हा केलेला नाही. कुणाच्या म्हणण्यावरुन गुन्हे दाखल होत असतील तर मग तुम्ही क्लिप दाखवताय, आमच्याकडे सीडी आहे, हे लक्षात ठेवा. जर त्या सीडी बाहेर आल्या तर महाविकास आघाडी मधील जे पक्ष आता मांडीला मांडी लावून बसलेलेत तेच ऐकमेकांवर केसेस दाखल करतील, अशी सीडी, अशी वक्तव्य, अपमान आम्ही दाखवून देऊ, हे सांगत आघाडीतील पक्षांनी केलेल्या वक्तव्यांंचा उहापोह ही शेलार त्यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur : मणिपूरमधील 'त्या' महिलांना पोलिसांनीच केलं जमावाच्या स्वाधीन; CBI चार्जशीटमध्ये धक्कादायक खुलासा

Labour Day : कामगार दिन! प्रत्येकाला माहिती असायला हवे असे भारतातील 11 कायदे

Satara Lok Sabha : शरद पवारच माझे मुख्य प्रचारक; असं का म्हणाले खासदार उदयनराजे?

रोहित शर्मा-विराट कोहली आंतरराष्ट्रीय टी-२० ला ठोकणार रामराम, 2024 चे वर्ल्डकप शेवटचे- रिपोर्ट

Latest Marathi News Live Update : राम सातपुतेंच्या प्रचारसभेसाठी योगी आदित्यनाथ यांची आज सोलापुरात सभा

SCROLL FOR NEXT