Strike
Strike 
मुंबई

कंत्राटी वैद्यकीय कर्मचारी मंगळवारपासून संपावर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्यातील १७ सरकारी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयांतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी मंगळवारपासून (ता. ५) बेमुदत संपावर जाणार आहेत. या रुग्णालयांत मुंबईतील जे. जे. समूह रुग्णालयातील जे. जे., कामा, सेंट जॉर्जेस आणि जी. टी. या चारही रुग्णालयांचा समावेश आहे. नोकरीत कायम करण्याचे आश्‍वासन सरकारने न पाळल्याच्या निषेधार्थ हा बेमुदत संप पुकारण्यात आला आहे. 

चतुर्थ श्रेणीतील २९ दिवसांच्या बदली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी केले जाईल, हे आश्‍वासन सरकारने न पाळल्याच्या निषेधार्थ बेमुदत संप पुकारला आहे, अशी माहिती राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस प्रकाश बने यांनी दिली. या संपात राज्यभरातील एकूण ११ हजार चतुर्थ श्रेणी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे काही कायमस्वरूपी कर्मचारीही संपात सहभागी होण्याची शक्‍यता आहे. संपाला काही दिवसांत नर्सिंग फेडरेशनकडूनही पाठिंबा जाहीर होण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय मंगळवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत न झाल्यास बेमुदत संप अटळ असेल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता उल्लंघन केल्याची तक्रार

SCROLL FOR NEXT