मुंबई

वैद्यकीय पदव्यत्तुर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला आणि झाली कोरोनाची लागण...

मिलिंद तांबे

मुंबई : महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयांमधील नवीन पदव्युत्तर डॉक्टरांनी महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर काहीच आठवड्यांतच त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंता वाढली आहे. महापालिका अधिकारी आणि महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेन्ट डॉक्टर (मार्ड) यांनी ओरिएंटेशन सेक्शन आणि कोरोनाचा संसर्ग कमी होण्याकडे लक्ष केंद्रित केले आहे.

मागील दोन ते तीन आठवड्यात सायन हॉस्पिटलमधील तीन, नायरच्या दोन आणि केईएममधील एका विद्यार्थ्याला कोरोनाची बाधा झाली. गेल्या तीन आठवड्यांपासून एमडी आणि एमएस पदवी घेण्यासाठी महाविद्यालयात प्रवेश सुरू झाले आहे. पीजी विद्यार्थ्यांचे तिसर्‍या वर्षाच्या परीक्षा असल्याने ते परिक्षेनिमित्त सुटीवर आहेत. तर एमडी, एमएसच्या पहिल्या वर्षाला शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कोव्हिड ड्युटीवर पाठविण्यात आले नसल्याने अन्य डॉक्टरांवर कामाचा प्रचंड ताण वाढला आहे, अशी माहिती मार्डने दिली आहे. 

सायन रुग्णालयात नव्याने दाखल झालेल्यांपैकी तीन रेसिडेंट डॉक्टरांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याचे सायन रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले. मार्चपासून रूग्णालयातील 300 हून अधिक आरोग्यसेवा कर्मचारी संक्रमित झाले होते पण गेल्या दोन महिन्यांत ही संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. या पुढे अधिक खबरदारी  घेऊन डॉक्टरांमधील संक्रमण कमी करण्याचा प्रयत्न करण्याचे खुद्द डॉक्टरांनी ठरवले आहे.

नायर रुग्णालयात नवीन निवासी डॉक्टरांपैकी दोन डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे.  मार्चपासून रूग्णालयात 80 डॉक्टर, ज्यात  67 रहिवासी, 10 वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी आणि तीन शिक्षक सदस्यांना बाधा झाली. नवीन विद्यार्थी बरे झाल्यानंतर, आम्ही  त्यांना पीपीई किट सुरक्षितपणे परिधान करण्याचे आणि स्वच्छता राखण्याबाबतची माहिती दिल्याचे मार्डने सांगितले.

नव्या पीजीच्या बॅचमधील डॉक्टर दोन आठवड्यांपूर्वी दाखल झाले आहेत. तिसऱ्या वर्षाच्या निवासी डॉक्टरांची परीक्षा असल्याने ते सुट्टीवर गेले आहेत. त्यामुळे अन्य डॉक्टरांवर कामाचा ताण वाढला आहे.  सात दिवस काम आणि सात दिवस क्वारंटाईन असताना आम्ही दहा दिवस काम आणि पाच दिवस क्वारंटाईन होऊन काम केले.
- डॉक्टर.
---
नवीन निवासी डॉक्टरांना झालेल्या कोरोनाबद्दल माहिती घेतो. परंतु कुणालाही कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी त्यांना खबरदारीचे उपाय सुचविले असून संरक्षक संसाधने देण्यात आली आहेत. तसेच त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिले जात आहे.
- डॉ. रमेश भारमल, अधिष्ठाता, सायन रुग्णालय.

----
संपादन : ऋषिराज तायडे 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT