रुग्णालयात मामाऐवजी भाच्याने दिला मोबाईल क्रमांक; मग काय आरोग्यसेतू अॅपवर भाचाच झाला पॉझिटिव्ह...

शर्मिला वाळुंज
Friday, 24 July 2020

डोंबिवली पूर्वेतील अमित पवार यांचे मामा (वय 57) यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. साधारण 11 जुलैला त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला.

ठाणे : डोंबिवली पूर्वेतील रहिवासी असलेले अमित पवार गेल्या शुक्रवारी काही कामानिमित्त त्यांच्या सरांना भेटायला गेले होते. सरांच्या आरोग्य सेतू अॅपवर त्यांच्या जवळपास हाय रिस्कमधील व्यक्ती वावरत असल्याचे आढळून आले. त्यावेळी मी जवळपास असल्याने त्यांनी अमित यांना आरोग्य सेतू अॅप चेक करण्यास सांगितले. बारकोड स्कॅनने ते चेक केले असता अमित यांना कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे दाखवल्याने अमित यांना धक्काच बसला.  

महिलांपेक्षा पुरुषांना कोरोनाचा धोका अधिक; तर 'या' वयोगटातील कोरोनाग्रस्तांचे प्रमाण जास्त...

डोंबिवली पूर्वेतील अमित पवार यांच्यासोबत ही घटना घडली आहे. प्रत्यक्षात अमित पवार यांचे मामा कोरोना बाधित आहेत. परंतु महापालिका रुग्णालयाच्या कागदपत्रांवर अमित यांनी त्यांचा संपर्क क्रमांक लिहिल्याने आरोग्य सेतू अॅपवर त्यांनाच पॉझिटिव्ह दाखविण्यात आले आहे. याप्रकरणी अमित यांनी आरोग्य सेतू अॅपला मेल पाठवून चुक दुरुस्त करावी, असे कळवल्याचे अमित यांनी सांगितले.

चक्क मुंबई पोलिसचं सांगताहेत नागरिकांना मास्क घालण्याची योग्य पद्धत

डोंबिवली पूर्वेतील अमित पवार यांचे मामा (वय 57) यांची तब्येत ठिक नसल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. साधारण 11 जुलैला त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मामा सुरुवातीला घाबरले. त्यांच्यासोबत कोणीच नसल्याने त्यांचा भाचा अमित याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी धडपड सुरु केली. 

ती करत होती कोरोनासाठीच्या औषधांचं ब्लॅक मार्केटिंग, पोलिसांना समजलं आणि गेम ओव्हर...​

''डोंबिवलीत आम्हाला कुठेच बेड मिळाला नाही, अखेर ठाणे येथे मामांना उपचारासाठी दाखल केले आहे. यावेळी रुग्णालयाच्या कागदपत्रांवर मी माझा संपर्क क्रमांक दिला होता. यामुळे सुरुवातीला मलाही या क्रमांकावर पालिका प्रशानाच्यावतीने काही फोन येऊन तुम्ही कोरोना बाधित आहात, कुठे दाखल आहात, अशी विचारणा झाली होती. त्यावेळी मी त्यांना माझे मामा कोरोना बाधित असून ठाणे येथे उपचारार्थ दाखल आहेत. डोंबिवलीमध्ये त्यांना एखादा बेड मिळाला तर बरे होईल अशी विचारणाही केली होती. परंतू त्याविषयी काहीही माहिती दिली गेली नाही.'' 

उत्पन्नप्राप्तीसाठी सरकारने आखली नवी योजना; त्यासाठी मुंबईतील 'या' जागेची झालीय निवड?​

''माझ्या मोबाईल नंबर आरोग्य सेतू अॅपवर नोंदविलेला आहे. महापालिकेत मी माझा संपर्क क्रमांक दिल्याने मी पॉझिटिव्ह नसूनही अशी नोंद त्या अॅपवर झाली आहे. ही चुकीची नोंदणी रद्द करावी अशी विनंती आम्ही आरोग्य सेतू अॅपच्या हेल्पलाईन क्रमांकावर केली आहे. तसेच त्यांना मेलही पाठविला,'' असे अमित पवार यांनी सांगितले.
----
संपादन : ऋषिराज तायडे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nephew registers his mobile no in hospital, so arogyasetu app show him positive