Students from TISS shows oppose of lathicharge on students from Jamia Milia
Students from TISS shows oppose of lathicharge on students from Jamia Milia 
मुंबई

TISSमध्ये कँडल मार्च; जामीया मिलीया, अलीगढमधील लाठीचार्जविरोधात निदर्शने

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : जामीया मिलीया व अलीगढ विद्यापीठातील विद्यार्थ्ययांवर होत असलेल्या लाठीचार्ज विरोधात देशभरातील महाविद्यालयांमधून निषेध नोंदवला जात आहे. मुंबईतील टाटा इन्स्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या विद्यार्थ्यांनीही कँडल मार्च काढत या घटनेचा निषेध केला आहे. 

नागरिक दुरुस्ती विधेयकाविरोधात जामीया मिलीया व अलिगढ विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी निदर्शने व आंदोलने केली होती. हे आंदोलन नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. याचे प्रत्युत्तर म्हणून विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली होती. यामुळे दिल्लीत कायदा सुव्यवस्था ढासळली होती.

या निदर्शानांमध्ये अनेक विद्यार्थी जखमी झाले. याचाच विरोध म्हणून देवनारच्या टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतील विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढून निषेध नोंदवला. सोमवारी (ता. 16) वर्गात सामूहिकरीत्या गैरहजर राहून बहिष्कार करणार आहेत. सर्व विद्यार्थी चर्चेसाठी जमू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2024 India Squad : विकेटकिपर निवडणं UPSC क्रॅक करण्यापेक्षाही झालं अवघड; 'यांनी' निवडसमितीची डोकेदुखी वाढवली

CSK vs SRH Live IPL 2024 : दोन हेवी वेट संघ भिडणार, विनिंग ट्रॅकवर कोण परतणार?

Uttarakhand Forest Fire : उत्तराखंडमध्ये जंगलाला भीषण आग! वणव्यांमुळे ३३.३४ हेक्टरवरील झाडे जळून खाक

Lok Sabha Election : PM मोदींबद्दलच्या टिप्पणीनंतर भाजपमधून हकालपट्टी, आता पोलिसांनी केली अटक; जाणून घ्या प्रकरण

Aaditya Thackeray : आदित्य ठाकरे कोल्हापुरात; म्हणाले, खोके सरकारने एकही नवा उद्योग आणला नाही

SCROLL FOR NEXT