मुंबई

Sameer Wankhede: वानखेडेंविरुद्धच्या चौकशीचा तपशील सादर करा; उच्च न्यायालयाचे निर्देश

सकाळ वृत्तसेवा

Mumbai News: कथित अनियमिततेबद्दल दोन वेगवेगळ्या प्रकरणात एनसीबीचे माजी मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या विरुद्ध एनसीबीने चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचा अहवाल सादर करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने एनसीबीला दिले.

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तसेच अंमली पदार्थ बाळगणाऱ्या नायजेरियन नागरिकावर कारवाई केल्या प्रकरणी एनसीबी मुंबईचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीने प्राथमिक चौकशी सुरू केली होती.

नोव्हेंबर २०२३ ते मार्च २०२४ पर्यंत, एनसीबीने वानखेडे यांना आठ नोटिसा बजावल्या तसेच चौकशी करणाऱ्या एनसीबीचे उपमहासंचालक संजय सिंह यांच्यासमोर हजर राहण्याचे निर्देश दिले.

वानखेडे यांनी ऍड राजीव चव्हाण यांच्या मार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल करून चौकशी आणि त्यांना बजावलेल्या नोटिसांना आव्हान दिले आहे. न्या. रेवती मोहिते डेरे आणि न्या. मंजुषा देशपांडे यांच्या समोर आज (ता.१८ ) सुनावणी घेण्यात आली.

तेव्हा केंद्रीय प्रशासकीय प्राधिकरणकडे (कॅट) दाद मागण्यासाठी अर्ज करण्यात आल्याची माहिती खंडपीठाला देण्यात आली.

त्यावर खंडपीठाने आक्षेप घेत प्रकरण कॅट समोर न्यायप्रविष्ठ असताना आमच्याकडे कडे कसा काय अर्ज दाखल करू शकता त्यावर ऍड चव्हाण यांनी सांगितले की ते प्रकरण वेगळे आहे.

कॅटमधील याचिका एनसीबीने सुरू केलेल्या दुसऱ्या चौकशीत जारी केलेल्या नोटिसांशी संबंधित आहे न्यायालयाने स्पष्टतेसाठी वानखेडे यांनी दाखल केलेल्या सर्व कार्यवाहीचा तपशील मागवला व सुनावणी २३ एप्रिल पर्यंत तहकूब केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"सिंचन घोटाळ्याप्रकरणी आरोप चुकीचे नव्हते, तेव्हा..."; देवेंद्र फडणवीसांनी मनातलं बोलून दाखवलं

धक्कादायक घटना! मुलीला बोटावर शस्त्रक्रियेसाठी नेले, डॉक्टरांनी चुकून केली जिभेवर शस्त्रक्रिया

लोकसभा निवडणुकीत भाजप-एनडीए 400 जागा पार करणार; अंबाबाई दर्शनानंतर माजी मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान

Corona Vaccine : कोरोना प्रतिबंधक ‘कोवॅक्सिन’चेही दुष्परिणाम; बनारस हिंदू विद्यापीठातील चाचण्यांमधील निरीक्षणे

T20 World Cup 2024: ICC ने केली सराव सामन्यांची घोषणा! टीम इंडियाचा सामना कोणत्या संघाविरुद्ध अन् कधी? पाहा संपूर्ण शेड्युल

SCROLL FOR NEXT