मुंबई

धुलाईअभावी शस्त्रक्रिया रखडल्या

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सेंट्रल लाँड्रीमध्ये पुरेसे कर्मचारी नसल्याने पालिकेच्या रुग्णालयांमध्ये रुग्णांसाठी वापरले जाणारे कपडे वेळेत धुतले जात नाहीत. त्यामुळे सायन रुग्णालयातील ४० शस्त्रक्रिया सोमवारी झाल्याच नाहीत. या शस्त्रक्रियांची तारीख तीन महिन्यांपूर्वी ठरली होती. अनेक रुग्णालयांमध्ये अशीच स्थिती असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. आरोग्य सेवेवर दर वर्षी २,७०० कोटी खर्च करणाऱ्या पालिकेच्या आरोग्य विभागाचे यामुळे धिंडवडे निघाले आहेत.

प्रभादेवी येथे महापालिकेची सेंट्रल लाँड्री आहे. तेथे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने रुग्णांसाठी वापरले जाणारे कपडे वेळेवर धुतले जात नाहीत. पालिकेच्या प्रत्येक रुग्णालयात रोज ४० ते ६० शस्त्रक्रिया होतात. सोमवारी सायन रुग्णालयात विविध विभागांत रुग्णांच्या ४० शस्त्रक्रिया होणार होत्या. मात्र, कपड्यांची धुलाई झालेली नसल्याने सर्व शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागल्या. रुग्णालय व्यवस्थापनानेच ही कबुली दिली. 

चौकशीची मागणी
सेंट्रल लाँड्रीमध्ये कपडे धुण्यासाठी असलेल्या १० पैकी दोन मशिन बंद आहेत. तेथे धुण्याकरिता दिलेले कपडे सुमारे १२ दिवसांनंतर मिळतात. लाँड्रीत कर्मचाऱ्यांची भरती करावी, बंद मशिनची दुरुस्ती करावी आणि खासगी लाँड्रीचे कंत्राट का वाढवले नाही, याची चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे नगरसेवक अशरफ आझमी यांनी केली आहे.

प्रभादेवीतील सेंट्रल लाँड्रीत कंत्राटी पद्धतीने कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबत आरोग्य विभागाच्या प्रमुखांशी चर्चा करून तातडीने निर्णय घेऊ. कपडे धुण्यासाठी खासगी लाँड्रीकरिता लवकरच निविदा काढू; या प्रकरणाची संपूर्ण चौकशी करू. 
- आय. ए. कुंदन, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT