Taj Mahal Palace Hotel
Taj Mahal Palace Hotel sakal
मुंबई

Taj Mahal Palace Hotel : वाह ताज! मुंबईच्या आयकॉनिक ताजला १२० वर्षे पुर्ण, विजेचा वापर करणारे पहिले हॉटेल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - मुंबईचे प्रवेशद्वार असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया' पुढे दिमाखात उभ्या असलेल्या आयकॉनिक 'ताज महल पॅलेस हॉटेल'ला नुकतेच १२० वर्षे पूर्ण झाले. या निमित्ताने या हॉटेलच्या प्रवासाला नव्याने उजाळा देण्यात आला. २००८ च्या मुंबई दहशतवादी हल्लानंतर हे हॉटेल नव्या जोमाने उभे राहीले होते.

नुकतेच (ता. १६) ताजच्या १२० व्या वर्षपुर्तीचा उत्सव इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडने साजरा केला. या उस्तवात ताजच्या पाहुण्यांना सहभागी करून घेण्यात आले. लाईट आणि साऊंड शो द्वारे हॉटेलचा वारसा आणि इतिहास उलगडून दाखवला गेला.

टाटा उद्योगसमुहाच्या 'ताज महल पॅलेस'हे पहिले पंचतारांकीत हॉटेल. या हॉटेलने भारतीय आदरतिथ्य क्षेत्राला नवी ओळख दिली. देशविदेशातील पाहुण्यांची पहिली पसंत 'ताज'च आहे. ताजनंतर नंतर टाटा उद्योगसमूहाने राजस्थान, केरळ, गोव्यासह देशभर आणि जगभरात अनेक लक्झरी पंचतारांकित हॉटेल्सची उभारणी केली. मात्र 'ताज महल पॅलेस'च्या लोकप्रियतेची बरोबरी इतर कुठलेही हॉटेल करु शकलेले नाही.

उद्योगपती जमशेदजी टाटा यांच्या दूरदृष्टिकोनातून उभे राहिलेल्या 'ताज महल पॅलेस'चा वास्तु रचना प्रसिध्द भारतीय वास्तुविशारद रावसाहेब वैद्य आणि डी एन मिर्झा यांनी केली. १८९८ बांधकामाला सुरुवात झाली. प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक सोराबजी कॉट्रॅक्टर यांनी वास्तुची उभारणी केली. मुख्य जिन्याचा आराखडा सोराबजी यांनी तयार केला होता. १६ डिसेंबर १९०३ ला हॉटेलचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले झाले. पहिल्या दिवशी १७ पाहुणे हॉटेलमध्ये राहीले. त्यावेळी 'गेट ऑफ इंडिया'चे बांधकाम सुरु झाले नव्हते.

दहा दशकाच्या काळात भारतात अनेक दर्जेदार पंचतांराकीत हॉटेल्स उभी राहीली. मात्र ताज आजही भारतीय आदरतिथ्य आणि पर्यटन क्षेत्राचे केंद्रबिंदू आणि प्रेरणास्थान आहे. फेडरेशन ऑफ हॉटेल अँड रेस्टारेंट असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष प्रदीप शेट्टी यांच्या मते ताजची हेरीटेज इमारत ही एका सुंदर स्मारकासारखी आहे. ताजचा दर्जा आणि लोकप्रियता कायम राखण्यामागे ताजचे उत्कृष्ट व्यवस्थापनाचा महत्वाचा वाटा आहे. व्यवस्थापन आपल्या कर्मचारी, पाहुण्यांची काळजी घेतात.

ताजचे गेस्ट

पहिल्या महायुध्दात या हॉटेलचे ६०० खाटांच्या रुग्णालयात परावर्तीत करण्यात आले. महात्मा गांधी. जवाहरलाल नेहरु, मोहम्मद अली जीना, सरोजीनी नायडू, खान अब्दुल गफ्फार खान इथे राहीले आहेत. किंग जॉर्ज -५ , राणी मेरी, जॉर्ज बर्नाड शॉ, द बीयेटल,मिक जागर,अल्फ्रेड हिचकॉक,झुबीन मेहता, दलाई लामा, बिल- हिलरी क्लिंटन, बराक ओबामा, नेल आर्मस्टॉग सारखे जगप्रसिध्द व्यक्ती या हॉटेलमध्ये राहीले आहेत.

जमशेदची टाटांची शेवटची बैठक

१६ डिसेंबरला ताज खुले झाले. याच दिवशी जमशेदजी टाटा यांनी संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून आपली शेवटची बैठक घेतली. या बैठकीत जे आर डी टाटा यांची कंपनीचे अतिरीक्त संचालक म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर जमशेदजी टाटा हे आरोग्य उपचारासाठी युरोपला निघून गेले. ते कधीच परत आले नाही. १९ मे १९०४ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

देशात पहिल्यांदा

- विजेचा वापर करणारे पहिले हॉटेल

- अमेरिकन पंखे, जर्मन उद्वाहन, तुर्कीश बाथ, इंग्लिश बटलर

- मुंबईतले पहिले लायसन्स बार

- पहिले नाईट क्लब, एयरकंडीशन बॉलरुम

- २४ तास सुरु असणारे शामिनाया रेस्टारेंट

- पहिले जपानी रेस्टारेंट 'वसाबी'

- मुंबईतला पहिला फॅशन शो

भारतीय आदरतिथ्य क्षेत्रात ताज महल पॅलेस हा देशाचा सशक्त आणि लोकप्रिय ब्रँड आहे. ताजच्या यशामध्ये अनेकांचा वाटा आहे.त्या सर्वांचा मी आभारी आहे.

- पुनीत चटवाल, व्यवस्थापकीय संचालक, IHCL

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election Exit Poll 2024: 'हा तर सरकारी एक्झिट पोल...', निकालांचा कल हाती आल्यानंतर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : एक्झिट पोलमध्ये देशात तिसऱ्यांदा NDA ची सत्ता; INDIA आघाडीला किती जागा मिळणार?

Loksabha election 2024 Exit Poll : एकच पठ्ठ्या म्हणतोय मोदी चारशेपार होतील! तेही घटकपक्षांना धरुन; काय आहे एक्झिट पोलची आकडेवारी?

Mumbai News : महिला प्रवाशांची रेल्वेला साथ; सुट्टी किंवा वर्क फ्रॉम होममुळे महिला डब्यात तुरळक गर्दी

OpenAI Robotics Comeback : लवकरच तुमच्या भेटीला येतोय 'AI रोबोट' ; प्रगत तंत्रज्ञान घेऊन OpenAIचं पुन्हा पदार्पण

SCROLL FOR NEXT