mhada
mhada 
मुंबई

म्हाडा काॅलनीत बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईतील लोकांच्या घरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा)च्या वतीने नव्याने घर उपलब्धी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडाच्या 56 काॅलनीत बेकायदेशीर पणे व्यवसाय करणा-यांची दुकाने बंद करण्याचा निर्णय म्हाडा प्रशासनाने घ्यावा या मागणीचे पत्र मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण म्हाडा उपाध्यक्ष मिलिंद म्हैसकर यांना दिले आहे.  

म्हाडा काॅलनीतील घरे व्यावसायिक वापरासाठी देण्या-या व्यक्तींसोबत असे प्रकार सुरू असूनही त्याकडे कानाडोळा करणा-या अधिकारी कर्मचा-यांवर कारवाईची मागणी या पत्रात केली आहे. सर्वांसाठी घरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न साकार करण्यासोबतच काॅलनीत राहत असलेल्या लोकांच्या समस्याही यामुळे सुटू शकतात असा अंदाज यात व्यक्त केला आहे.
काॅलनीतील मोकळ्या जागांचाही अशाच बेकायदेशीर  पद्धतीने वापर सुरू असल्याने या जागा तात्काळ रिकाम्या करून त्या ठिकाणी सामान्य नागरिकांसाठी घरे निर्माण करावी असा  विचार असल्याचे मधू चव्हाण यांनी सांगितले.  

अशा प्रकारे व्यवसाय करणारे सरकारला करही देत नसल्याची बाफ उघड झाल्याने अशा लोकांवर दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी आहे.

म्हाडाा काॅॅॅलनीत बेकायदेशीर वास्तव््य करणार््या कब््जेधारकांवर कारवई केली  तसेच एमआरटीपी अंतर्गत कारवाई केेेली तर अशा बेेेेकायदे दुकानदार आणि  निवासी संकुलातील व्यावसाायिक गाळेधारकाांवर कारवाई केेली तर मोठ्या प्रमाणात जागा उपलब्ध होईल 
- मधु चव्हाण, सभापती, मुंबई मंडळ  म्हाडा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT