मुंबई, ता. 22 : मुंबईत वडाळा येथील अवैध प्रार्थनास्थळांचा ताबा घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बृहन्मुंबई महापालिकेला दिले आहेत. असं असलं तरीही, मंदिरावरील पाडकामावर मात्र न्यायालयाने तूर्तास स्थगिती दिली आहे.
वडाळ्यामधील गणेश मंदिर मार्गावरील साईधाम मित्र मंडळ मंदिरावर कारवाई करण्याचे निर्देश न्यायालयाने मे महिन्यामध्ये दिले होते.लॉकडाऊन हटविल्यानंतर यावर कारवाई करण्याची हमी महापालिकेच्या वतीने देण्यात आली होती. न्यायालयाने ही हमी मान्य करून, कोणत्याही धार्मिक कार्यक्रमासाठी मंदिराचा वापर करायला मनाई केली होती. मात्र असे असतानाही गणेशोत्सवमध्ये मंदिराचा वापर करण्यात आला, त्यामुळे न्यायालयाने दिलेल्या आदेशांचा अवमान झाला आहे, असे सांगणारी याचिका सामाजिक कार्यकर्ते फ्लेचर पटेल यांनी केली आहे. महापालिकेने यामध्ये दखल दिली नाही, अशी तक्रारही करण्यात आली.
याच घटनेची नोंद घेत न्यायालयाने संबंधित स्थानिक रहिवाशांकडून खुलासा करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांची बाजू ऐकून घेईपर्यंत पाडकामावर स्थगितीचा आदेश न्यायालयाने दिला. महापालिकेकडून याचिकेतील मुद्यांवर कबुली देण्यात आली. तसेच दिलगिरी व्यक्त करून कारवाईची हमी देण्यात आली होती.
( संपादन - सुमित बागुल )
take custody of illegal prayer houses and temples mumbai HC to BMC
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.