मुंबई

शिक्षक दिनी शिक्षकांचा पुरस्कार देऊन गौरव

संजीत वायंगणकर

डोंबिवली- समाजात प्रत्येकाला स्वतःची अशी वेगळी ओळख तयार होण्यासाठी विद्यादानाबरोबरच सुसंस्कार घडविणारे शिक्षक महत्त्वाचे असतात असे प्रतिपादन गंगाराम शेलार यांनी केले. विविध विषयाच्या अध्ययनाबरोबरच समाजकार्यात पुढाकार घेऊन भावी पिढीला आकार देण्याचे कार्य करणाऱ्या दहा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरव केल्यानंतर खंबाळपाडा येथील पालिका शाळेत शेलार बोलत होते.

सर्वसाधारण गरीब विध्यार्थांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी दूर करुन विविध उपक्रमांद्वारे सहाय्य करण्याचे उद्दिष्ट ठेऊन बारा वर्षे काम करणाऱ्या प्रेरणा शिक्षण सहाय्यक संस्थेतर्फे शिक्षकदीनाचे औचित्य साधून कार्यक्रम आयोजित करण्यात आला. संस्थेने शिक्षकांना आदर्श पुरस्कार आणि विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. विशेष म्हणजे हा दुग्धशर्करा योग महापालिकेच्या हुतात्मा बाबू गेनू मराठी शाळा क्र.70 खंबाळपाडा येथे जुळून आला.

यावेळी व्यासपीठावर नगरसेवक साई शेलार, माजी परिवहन सभापती गंगाराम शेलार, शालेय व्यवस्थापन समितीचे काशिनाथ फर्डे, राजेंद्र मेनन व प्रेरणाचे अध्यक्ष महेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते, महेश मोरे याकार्यक्रम प्रसांगी म्हणाले कि, संस्थेच्या उद्दिष्टानुसार शैक्षणिक क्षेत्रात काम सुरु आहे. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वेळोवेळी पुरविण्याचे काम संस्था करीत आहे. या कार्यात अनके सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या मान्यवर व्यक्तींची साथ मिळते. शैक्षणिक साहित्य व्यतिरिक्त सायकल वाटप, शिलाई मशीन, श्रवण यंत्रे, कापडी पिशव्या, अपंगांसाठी तीन चाकी सायकल, आश्रम शाळेतील विद्यार्थांना युनिफॉर्म आदी साहित्य देण्यात आले आहे.

शैक्षणिक क्षेत्रात महान कार्य करणाऱ्या खंबाळपाडा क्षेत्रातील पालिका व खासगी शाळेतील शिक्षकांना आदर्श पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणायत आला. गणेश रघुनाथ पाटील, मधुकर जाधव, नंदा गणेश पाटील, अशोक रामाराव बोरसे, शिवाजी रामदास पाटील, रमिलाबेन कांतीलाल पांचाळ, गणेश जगन्नाथ भानुशाली, पुष्कर राजीव देशपांडे आणि अरविंद मारुती गोलाईकर या सर्व शिक्षकांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच शाळेतील सुमारे दोनशे विद्यार्थ्यांना परीक्षा पॅड, कंपासबॉक्स, वह्या-पेन-पेन्सिल आदी शैक्षणिक साहित्य आणि खाऊ देण्यात आला. 

लक्ष्मण जाधव, गणेश पाटील, अरविंद बोलाईकर, दिनेश वैद्य, उमेश मोरे, प्रवीण दौंडी मंगेश बोरवडे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष मेहनत घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT