मुंबई

दहावीच्या विद्यार्थिनीची शाळेच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

भिवंडी ः चाचणी परीक्षेचा पेपर संपल्यानंतर शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना भिवंडीतील नागाव सलामतपुरा परिसरात असलेल्या अन्सारी साफिया गर्ल्स उर्दू हायस्कूलमध्ये घडली.

तिला गंभीर जखमी अवस्थेत जेजे रुग्णालयात उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच तिचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. मानसिक तणावामुळे तिने आत्महत्या केल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे. 
भिवंडी शहरातील शांतीनगर भागातील फातमानगर येथे राहणारी मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख (14) ही अन्सारी साफिया गर्ल्स उर्दू हायस्कूलमध्ये दहावीच्या वर्गात शिकत होती.

शाळेत सध्या चाचणी परीक्षा सुरू आहे. बुधवारी इतिहास, राज्यशास्त्र या विषयाचा पेपर होता. सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास मुबशीरा हिने पेपर सुटल्यावर शाळेच्या पाचव्या मजल्यावर जाऊन तेथील गॅलरीतून उडी मारून आत्महत्या केली. 
मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख ही थेट शाळे समोरच्या पटांगणात जोरात आपटली. त्यावेळी काही विद्यार्थिनी वऱ्हांड्यात उभ्या असल्याने त्यांना जोरात काही तरी आदळल्याचा आवाज आला असता मुली तेथे धावून आल्यावर आत्महत्येचा प्रकार समोर आला.

या वेळी तत्काळ शाळेतील शिपायांनी धाव घेत जखमी मुबशीरा बानो नुरुद्दीन शेख हिला उचलून वंजारपट्टी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी घेऊन गेले. परंतु, त्यांना सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिल्यावर तिला इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथे प्रथमोपचार करून तिला पुढील उपचारासाठी जेजे रुग्णालयात हलविले.

परंतु, उपचारासाठी घेऊन जात असताना रस्त्यातच तिची प्राणज्योत मालवली. या मुलीची आत्महत्या करतानाची घटना शाळेच्या आवारातील सीसी टीव्हीमध्ये कैद झाली असून, शांतीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सदर मुलीने आत्महत्या का केली, याबाबत तपास सुरू केला आहे. घटनेबाबत शाळा व्यवस्थापनाकडून माहिती घेणे सुरू असून, पुढील तपास पोलिस निरीक्षक ममता डिसोझा करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT