Terrorist
Terrorist Sakal
मुंबई

Terrorist : आयएसआयएस महाराष्ट्र मोड्युल प्रकरणात अटक सातव्या आरोपी दहशतवाद्याला एनआयएची कोठडी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एनआयएने शुक्रवारी ठाण्याच्या पडघा परिसरात अचानक धाड टाकून शमील नाचणला अटक केली होती. मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयाने आरोपी नाचणला 18 ऑगस्टपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.

आरोपी शमीलने दहशतवादी कृत्यांसाठी बॉंबस्फोट घडून आणण्याचे प्रशिक्षण घेऊन त्याची चाचणी करत असल्याचे एनआयएच्या तपासात समोर आले. यापूर्वी अटक केलेल्या अकिब नाचण, जुल्फिकार अली बडोदावाला, मोहम्मद इम्रान खान, मोहम्मद युनूस साकी, सिमाब नसिरुद्दीन काझी आणि अब्दुल कादिर पठाण आणि इतर काही संशयितांसह इतर पाच आरोपींच्या सहकार्याने शमिल कारवाया करत होता.

शस्त्र बनवण्याचे ट्रेनिंग

एनआयएच्या तपासात अटक केलेल्या सहा जणांनी त्यांच्या साथीदारांसह आयसिसमध्ये काही तरुणांची भरती केल्याचे समोर आले. तरुणांना शस्त्रे बनवण्याचे प्रशिक्षण दिले गेले असून आरोपींनी 'डू इट युवरसेल्फ किट्स' यासह संबंधित सामग्री देखील आपापसात सामायिक केली होती.

ज्यात बॉंब तयार करणे, लहान शस्त्रे, पिस्तूल इत्यादी बनवणे या कृत्यांचा समावेश होता. त्यांच्या परदेशातील आयसिसच्या हँडलर्सच्या निर्देशानुसार, आरोपींनी दहशतवाद आणि हिंसाचाराच्या अजेंड्याला पुढे नेण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ हिंद’ या मासिकात प्रक्षोभक मीडिया सामग्री देखील तयार केली होती, असेही 'एनआयएच्या तपासात समोर आले.

नातेवाईक अटकेत

पडघा परिसरातून 6 ऑगस्टला शमीलचा नातेवाईक अकिब नाचणलाही याच परिसरातून अटक केली होती. तर गेल्याच महिन्यात याच परिसरातून शरजील शेख आणि झुल्फिकार अली बडोदावाला या दोघांना अटक केली.

विशेष म्हणजे शमीलचा बाप साकिब नाचण हा बंदी असलेल्या ‘सिमी’ संघटनेचा पदाधिकारी होता. त्यामुळे देशविघातक व दहशतवादी कृत्यांत पडघा-सरकारच्या गुप्तचर यंत्रणेच्या दृष्टीने अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाऊ लागले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT