shivsena
shivsena sakal
मुंबई

ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख विजय साळवी यांच्यासह 22 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : पाच पेक्षा अधिका नागरिकांनी जमावाने एकत्र येऊ नये असा ठाणे पोलीस आयुक्तांचा मनाई आदेश असताना त्या आदेशाचा भंग केला म्हणून शिवसेनेचे ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख विजय उर्फ बंड्या साळवी यांच्यासह २२ शिवसेना पदाधिकाऱ्यांवर महात्मा फुले पोलीस ठाण्यात पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वीच साळवी यांना मुंबई, ठाणे, रायगड जिल्ह्यातून तडीपारीची नोटीस पोलिसांनी बजावली आहे. या प्रकरणाचा निषेध नोंदविण्यासाठी शिवसैनिक रामबाग दत्तमंदिर येथे जमले होते.

ठाकरे गटाचे कल्याण जिल्हाप्रमुख साळवी यांना सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी तडीपारीची नोटीस बजावली आहे. या प्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी शहरप्रमुखांसह अनेक शिवसैनिक रामबाग दत्तमंदिर येथे मंगळवारी सकाळी जमले होते. शिवसैनिकांनी यावेळी दडपशाही विरोधात घोषणाबाजी केली होती. ठाकरे गटाचे शहरप्रमुखांसह शिष्टमंडळाने महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे जमावाने जात सहाय्यक पोलीस आयुक्तांची भेट घेतली होती. यावेळी साळवी यांची बाजू मांडण्यात आली. साळवी यांच्या वरील सर्व गुन्हे हे जनहिताचे राजकीय स्वरुपाचे आहे. काही प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. यामुळे या कारवाईचा विचार करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलिसांना केली होती.

पाच पेक्षा जास्त नागरिकांनी एकत्र येण्यास मनाई आदेश असताना या आदेशाचा भंग केला म्हणून साळवी यांच्यासह 22 शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार साहेबराव मुठे यांच्या तक्रारीवरुन महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंद करण्यात आला. याआधीही गणेशोत्सवात देखावा केल्याप्रकरणी साळवी यांच्या मंडळावर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर दुर्गाडी देवीवर शारदीय नवरात्रोत्सव साजरा करण्याची परवानगी ठाकरे गटाला नाकारण्यात आली. शिवाय साळवी यांना तडीपारीची नोटीस आणि आता साळवी यांच्यासह 22 शिवसैनिकांवर गुन्हे दाखल झाल्याने शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

Viral Video: 'बाबा वारले,आई सोडून गेली..' रोल विकणाऱ्या १० वर्षांच्या मुलाची हिंमत पाहून भारावले आनंद महिंद्रा, केली मोठी घोषणा

Bomb Hoax in 16 Schools: मतदानादिवशी 16 शाळांना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी! रशियातून आला ईमेल ? पोलिसांचं धाबं दणाणलं

SCROLL FOR NEXT