मुंबई

विधायक: थायलंड बास्केटबॉल संघटनेने मास्कच्या निर्मितीबाबत घेतला मोठा निर्णय...

सकाळ वृत्तसेवा

बॅंकॉक : कोरोनाविरोधातील लढ्यासाठी क्रीडा क्षेत्र आणि खेळाडूही प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष मैदानात उतरलेले आहेत. कोणी आर्थिक मदत करत आहे, तर कोणी रस्त्यावर उतरून सहाय्य करत आहेत. थायलंडची बास्केटबॉल संघटना तर चार कोटी मास्क बनवणार आहे. 

थायलंडच्या बास्केटबॉल संघटनेचे अध्यक्ष निपोंध चावलीमोंटेन यांनी ही घोषणा केली. संघटनेतील अध्यक्षपदाबरोबर निपोंध बॅंकॉकमधील एका वस्त्रउद्योक आणि एक्‍स्पोर्ट करणाऱ्या कंपनीचे आर्थिक संचालकही आहेत. थायलंड सरकार आणि तेथील खासगी क्षेत्राची मदत घेऊन निपोंध त्यांच्या कंपनीतून निर्जंतुक मास्क तयार करणार आहेत. 
सध्या सर्व क्रीडा क्षेत्र बंद झाले आहे. अशा परिस्थितीत आमची बास्केटबॉल संघटना लोकहितासाठी काय करू शकते, असा विचार मी केला. त्यानंतर मी लगेचच बैठक घेतली. किती आर्थिक मदत लागेल, याचा अंदाज घेतला आणि त्यानंतर लगेचच हा निर्णय घेतला, असे निपोंध यांनी सांगितले. 

आम्ही केवळ बास्केटबॉलशी संबंधित असलेल्यांनाच हे मास्क देणार नसून इतर खेळातील लोकांनाही त्याचा पुरवठा करणार आहोत. आमचे मास्क धुऊन पुन्हा वापर करण्याजोगे असतील, असे निपोंध यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : खोके द्या, फोडा अन् राज्य करा ; पटोलेंची मोदींवर टीका,राज्याचे नुकसान केल्याचा आरोप

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Latest Marathi News Live Update : PM मोदींची माढा, धाराशिवसह लातूरमध्ये सभा, तर 25 वर्षानंतर वेल्ह्यात धडाडणार शरद पवारांची तोफ

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

SCROLL FOR NEXT