Atrosity on bjp karyakarta  esakal
मुंबई

Thane: घर हडप करून जातीवाचक शिविगाळ, भाजपच्या माजी नगरसेवका विरोधात गुन्हा दाखल

Crime of Bjp Person: भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दिले. मात्र, जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला.

सकाळ वृत्तसेवा

BJP Crime: घर हडप करून जातीवाचक शिविगाळ केल्याप्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फुफानी कंपाऊंड,  डोंगरीपाडा किंककाँग नगर येथे स्वप्नाली अशोक सोनावले यांचे घर आहे. हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली सोनावले या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या असता, संबधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. तसेच, हे घर मनोहर डुंबरे यांनी दहा लाखाला विकले असल्याचे सांगितले. यासंदर्भात भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दिले. मात्र, जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला.

त्यामुळे स्वप्नाली सोनावले यांनी पुन्हा डुंबरे यांना फोन केला असता, हे घर माझे आहे. तुम्ही कोण आहात? मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असे म्हणत डुंबरे यांनी स्वप्नाली सोनावले यांना जातीवाचक शिविगाळ केली होती. या प्रकरणी  कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. मात्र, पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली सोनावले यांनी न्यायालयात 156 (3) नुसार याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना ९ जुलै रोजी न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.

त्यानुसार मंगळवार १६ जुलै रात्री कासारवडवली पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 3 (अ) , 3 (1)(4) आणि 3 (1) (9) नुसार गुन्हा दाखल केला आहे. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे,अशोक सोनावले, रमेश समुखराव, राजाभाई सूर्यवंशी, समीर भाऊ नेटके, ज्ञानेश्वर राजपंके, कृपेश सूर्यवंशी, नाना मगदूम, चंपत गवले,रवी शिरसाठ, दिपक आवरे, जगदिश सोनटक्के, मल्हारी शिंदे, संजय भोसले,माणिक रजापांके, कृष्णा खंडागळे आदी उपस्थित होते.

सोनावळे हा पुर्वी माझा कार्यकर्ता म्हणून काम करीत होता. मात्र, त्याने माझ्या नावाचा गैरवापर करून सरकारी जागेवर अतिक्रमण करून दुकानाचे गाळे व रुम बांधल्या. तसेच काही जणांकडून पैसे घेतले होते. याबाबत माझ्याकडे तक्रारी आल्यानंतर मी तातडीने त्याला कार्यालयात येण्यास मनाई केली. त्याचा राग धरून त्याने समाजाची ढाल उभी करून माझ्याविरोधात अॅट्रॉसिटीचा आधार घेऊन खोट्या तक्रारी व माझ्याविरोधात खोटे गुन्हे दाखल केले आहेत. मी निर्दोष असून, या संदर्भात पोलिस तपासात मला निश्चितच न्याय मिळेल.

- मनोहर डुंबरे, माजी गटनेता, ठामपा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT