thane municipal corporation daighar electricity generation project oppose of villagers
thane municipal corporation daighar electricity generation project oppose of villagers sakal
मुंबई

Dombivli News : ठाणे महानगरपालिकेच्या डायघर वीज प्रकल्पाला स्थानिकांचा "रेड सिग्नल''

शर्मिला वाळुंज

डोंबिवली - ठाणे महानगरपालिकेच्या वतीने डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पास गावकऱ्यांचा सुरवातीपासून विरोध राहिला असून हा प्रकल्प येथून हटावा यासाठी ग्रामस्थ आज ही लढा देत आहे.

ग्रामस्थांच्या प्रश्नांकडे ठाणे महापालिका गांभीर्याने लक्ष देत नसल्याने गावकऱ्यांनी आता धरणे आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. शुक्रवारी ग्रामस्थ येथे आंदोलनाला बसले आहेत. आंदोलन करत पालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ग्रामस्थ करत असून यावर आता पालिका प्रशासन काय भूमिका घेते पहावे लागेल.

ठाणे महानगरपालिकेचा डायघर येथे कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू झाला आहे. या प्रकल्पात कचरा घेऊन जाताना घंटागाड्यांमधून कचरा मार्गात रस्त्यावर सांडत आहे. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी आणि डासांचा त्रास हा रहिवासी आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.

डायघर प्रकल्प सुरू होण्यापूर्वी ग्रामस्थांनी त्याला विरोध केला होता. मात्र स्थानिकांचा विरोध बाजूला सारत ठाणे महापालिकेने प्रकल्प सुरू केला. पालिका अधिकारी ग्रामस्थांना यामुळे प्रदूषण होणार नाही अशी ग्वाही वेळोवेळी देत आहेत.

मात्र प्रत्यक्षात गावांवर प्रदूषणाची चादर पसरली आहे. त्यामुळे शुक्रवारी ग्रामस्थांनी धरणे आंदोलन करून आपला निषेध व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मंजूर सुधारित विकास आराखड्यात डायघर येथील सर्व्ह नंबर 13, 14, 18, 19, 20 या 18 हेक्टर पार्क साठी आरक्षित जमिनीपैकी 5 हेक्टर जमिनित सुरु

असलेले घनकचरा प्रकल्प रद्द व्हावे या करीता राज्य शासन व ठाणे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरीता शुक्रवारी पडले गावाजवळ ग्रामस्थांनी एकत्र येऊन धरणे लक्षवेधी आंदोलन केलं आहे.

या आंदोलनात मोठ्या संख्येने आजूबाजूच्या गृह संकुलातील रहिवासी आणि भूमीपुत्रांच्या संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते. येत्या कालखंडात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील भूमीपुत्रांच्या वतीने देण्यात आला आहे.त्यामुळे ठाण्याची आता पुन्हा एन अधिवेशन कालखंडात कचरा कोंडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी 8 टक्के मतदान

Akshay Kumar: खिलाडी अक्षय कुमारनं भारताचं नागरिकत्व मिळाल्यानंतर पहिल्यांदाच केलं मतदान; म्हणाला, "माझा भारत देश हा..."

Latest Marathi Live News Update: सुनील राऊत पोलिसांवर भडकले

PM Modi : मतपेढीच्या तुष्टीकरणासाठी संस्थांना धमक्या; पंतप्रधानांची ममतांवर टीका

Standing Problems: तुम्हीही जास्त वेळ उभे राहत असाल तर वाढू शकतात 'या' समस्या

SCROLL FOR NEXT