Kalu River
Kalu River 
मुंबई

मुरबाड: काळू नदीवरील पूल जड वाहनांसाठी सुरू करण्याची मागणी

मुरलीधर दळवी

मुरबाड : नाशिक ते मुंबई व पुणे ते मुंबई हे दोन राष्ट्रीय महामार्ग एकमेकाला जोडून नाशिक येथून जे एन पि टी बंदराकडे जाणारी वाहतूक सुरळीत व वेगवान व्हावी म्हणून नाशिक, शहापूर, लेनाड, मुरबाड, कर्जत, खोपोली हा 548 ए असा नवा राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. पण या महामार्गावरील मुरबाड व शहापूर तालुका जोडणाऱ्या काळू नदीवरील पूल कमकुवत असल्याने तो जड वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद आहे  दुरुस्तीसाठी गेले वर्षभर बंद असलेल्या या पुलावर एक रुपयाही खर्च झाला नाही तो जड वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्याची लोकांची मागणी आहे.

मुरबाड लेनाडमार्गे शहापूर या राष्ट्रीय महामार्गावरील काळू नदीवर असलेल्या पुलावरून गेले वर्षभर बंद असलेली जड वाहनांची वाहतूक पुन्हा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत आहे. गेल्या वर्षभरात या पुलाची दुरुस्ती करण्यासाठी एक रुपया सुद्धा खर्च करण्यात आला नाही. केवळ लोखंडी पिंपे ठेवून पुलाचा धोकादायक भाग संरक्षित करण्यात आला आहे व पुलाच्या दोन्ही बाजूंना लोखंडी खांबांची कमान लावून अडथळे निर्माण करण्यात आले आहेत. 

मुंबई गोवा महामार्गावर सावित्री नदीवरील पूल कोसळल्या नंतर या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. त्यामध्ये हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे लक्षात आल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलावरील वाहतूक मागच्या वर्षापासून पूर्णपणे बंद केली. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी येथून हलकी वाहने जाण्यास सवलत दिली आहे. 

या पुलावरून वाहतूक बंद असल्याने नाशिककडून शहापूर मुरबाड कर्जत मार्गे जेएनपीटीकडे ये जा करणारी वाहने शहापूर लेनाड किन्हवली सरळगाव मुरबाड असा वळसा घालून जातात. हे अंतर 10 किलोमीटरने जास्त असल्याने इंधन जास्त लागते व वाहनांचा वेळ वाया जातो. तसेच एसटी बंद असल्याने मुरबाड शहापूर प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी याना त्रास होतो. त्यामुळे मुरबाड लेनाड मार्गे शहापूर या रस्त्यावरील काळूनदीच्या पुलाची तातडीने दुरुस्ती करून पुलावरून जड वाहनांची वाहतूक सुरू करावी अशी मागणी मुरबाड येथील उद्योजक चंद्रकांत घाडगे यांनी केली आहे.

खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहापूर, लेनाड, मुरबाड, कर्जत, खालापूर हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग घोषित करण्यात आला आहे. त्यांनी लक्ष देऊन या पुलाची तातडीने दुरुस्ती करणेसाठी पुढाकार घेऊन वाहतूक सुरू करावी अशी मागणी आहे.

काळू नदीवरील पुलाच्या दुरुस्तीसाठी हुडको मार्फत निधी मंजूर झाला असून, लवकरच दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे.
- कपिल पाटील, खासदार भिवंडी लोकसभा मतदार संघ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT