There is no laboratory in Mumbai for Gutkha Aromatic Tobacco  betel nut testing
There is no laboratory in Mumbai for Gutkha Aromatic Tobacco betel nut testing  sakal
मुंबई

Mumbai News : गुटखा, सुगंधी तंबाखू - सुपारी तपासणीला मुंबईत प्रयोगशाळाच नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत गुटखा, सुगंधी सुपारी, सुगंधी तंबाखू यावर प्रतिबंधात्मक कारवाई मुंबई पोलिसांकडून करण्यात येते. त्यानंतर जप्त केलेल्या गुटखा, सुपारी आणि तंबाखूचे नमुने हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी येतात. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांनी हे नमुने तपासणीसाठी देण्याची कार्यवाहीच बंद केली आहे.

मुंबईतील कोणतीच प्रयोगशाळा हे नमुने घेण्यासाठी तयारी दाखवत नसल्याने मुंबईतील या गोष्टींवर प्रतिबंधात्मक कारवाई सध्या थंडावली आहे. तसेच प्रयोग शाळेत पोहचवण्यात येणारे नमुनेही बंद झाले आहेत.

मुंबई महानगरपालिकेची एकमेव प्रयोगशाळा (NABL) अॅक्रेडेशन स्थगित झाल्याने कामकाजात नाही. तर दुसरीकडे अन्न व औषध प्रशासनाची प्रयोगशाळा मुंबई पोलिसांकडून येणारे गुटखा, सुपारी आणि तंबाखूचे नमुने घेत नाही.

त्यामुळे मुंबईतील प्रतिबंधात्मक कारवाई या गोष्टींचा परिणाम होत आहे. मुंबईत महिन्यापोटी २०० ते ३०० नमुने हे महानगरपालिकेच्या प्रयोगशाळेत तपासणीसाठी येत असतात. परंतु डिसेंबर २०२२ मध्ये महानगरपालिकेच्या लॅबला अॅक्रेडेशन मिळाले नसल्याने या प्रयोगशाळेत नमुने तपासणीसाठी घेतले जात नाही ही स्थिती आहे.

भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण कायद्यान्वये पोलिसांची जबाबदारी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची असते. त्यानंतर स्थानिक पोलीस ठाण्यात या प्रकरणातील एफआयआर दाखल करण्याची प्रक्रिया असते.

त्या प्रक्रियेचा भाग म्हणूनच या गुटखा, तंबाखू आणि सुपारीचे नमुने हे प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात येतात. परंतु मुंबईतील तिन्ही प्रयोगशाळा हे नमुने घेण्यासाठी सध्या असमर्थ आहेत. त्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने कामाच्या ताणामुळे हे नमुने घेण्यासाठी नकार दिलेला आहे. तर मुंबईतील फॉरेन्सिक प्रयोगशाळेत असे नमुने घेतले जात नाहीत.

तर मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये मात्र हे नमुने घेण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे. मुंबई महानगरपालिकेत एनएबीएलमार्फत येत्या दिवसात ऑडिट पार पडेल. त्यानंतरच पालिकेला आयएसओ मानांकन मिळेल. या प्रक्रियेला आणखी कालावधी लागणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस या गोष्टींवरील नमुने मुंबईतील कोणत्याच प्रयोगशाळेत स्विकारले जाणार नाहीत अशी स्थिती असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yogi Adityanath : जगाला शांतता संदेश देणाऱ्या सनातन परंपरेचा काँग्रेसनं अपमान केलाय, त्याचं अस्तित्व नाकारलंय; योगींचा घणाघात

Daily Panchang : आजचे पंचांग आणि दिनविशेष - 02 मे 2024

Sakal Podcast: शिर्डी मतदारसंघात काय होणार? ते तुरुंगातील नेत्यांना व्हर्च्युअल प्रचार करता येणार नाही

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी राहुल गांधी आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT