hukka
hukka 
मुंबई

हर्बल हुक्काला तंबाखू हुक्काचे नियम नाही

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : तंबाखूमुक्त (हर्बल) हुक्का पार्लरसाठी तंबाखूजन्य हुक्का पार्लरचे नियम लागू होणार नाहीत, असे आज मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. हर्बल हुक्कापार्लर चालविणाऱ्या रेस्टॉरंट चालकालाही न्यायालयाने दिलासा दिला. यामुळे हर्बल हुक्कापार्लरलाही आता परवानगी मिळाली आहे. 

सिगारेट आणि अन्य तंबाखूजन्य उत्पादन कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली असून हुक्कापार्लरवर मुंबई महापालिकेकडून कारवाई करण्यात येत आहे. याविरोधात रेस्टॉरंट चालक अली रेझा अब्दी यांनी उच्च न्यायालयात याचिका केली होती. याचिकेवर आज न्या. रणजीत मोरे आणि न्या. भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. हुक्कापार्लरबाबत अद्यापी राज्य सरकारने मार्गदर्शक तत्वे निश्‍चित केलेली नाहीत. त्यामुळे ते कोणत्या आधारावर कारवाई करतात, असा प्रश्‍न याचिकादाराच्या वतीने उपस्थित केला होता. सध्या तंबाखूजन्य उत्पादन कायद्यानुसार कारवाई केली जात असली तरी आमच्या हुक्कापार्लरमध्ये हर्बल हुक्कापार्लर चालविला जातो, त्यामुळे या कायद्यानुसार अमंलबजावणी करता येणार नाही, असेही यावेळी सांगण्यात आले. न्यायालयाने हा युक्तिवाद ग्राह्य मानला. याचिकादार हर्बल हुक्का पार्लर चालवू शकतात. मात्र यापुढे त्यांनी तंबाखूजन्य हुक्कापार्लर चालविले तर त्यांच्यावर प्रशासन कारवाई करु शकते, असेही खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

शीशा स्कायलॉज या ब्रॅण्डने याचिकादाराचे तीन रेस्टॉरंट आहेत. याठिकाणी चारशेहून अधिक कर्मचारी काम करतात. मात्र दोन वर्षांपूर्वी कमला मिल परिसरात लागलेल्या आगीमुळे राज्य सरकारने कायद्यामध्ये सुधारणा केली होती आणि सरसकट हुक्कापार्लरवर कारवाई सुरू केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED: "जे काही चालले आहे ते अतिशय गंभीर आहे," कोर्टाने ईडीला का फटकारले? वाचा संपूर्ण प्रकरण

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टी किंचित वाढीसह उघडले; सेन्सेक्स 74,600च्या पुढे, कोणते शेअर्स वधारले?

Viral Video: जिममध्ये वॉर्मअप करत असताना अचानक जमिनीवर कोसळला; तरुणाचा हर्ट अटॅकमुळे मृत्यू, पाहा व्हिडिओ

IPL 2024 : प्ले-ऑफमधून इंग्लंडचे खेळाडू बाहेर जाण्यामागे बटलरचा हात; बोर्डाने केला मोठा खुलासा

Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

SCROLL FOR NEXT