Girish-Mahajan
Girish-Mahajan 
मुंबई

औषधांची कमतरता भासणार नाही

सकाळन्यूजनेटवर्क
मुंबई - राज्यातल्या शासकीय रुग्णालयात रुग्णांना औषध पुरवठा सुरू असून, या पुढे औषधांची कमतरता भासणार नाही, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी या वेळी दिली. राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याच्या मुद्द्यावरून मंगळवारी विधान परिषदेत विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन आणि विरोधक यांच्यामध्ये या मुद्द्यावर जोरदार खडाजंगी होऊन गोंधळ झाला. यावर सभागृह पाच मिनिटांसाठी स्थगित करण्यात आले. दरम्यान, औषधांच्या कमतरतेमुळे काही रुग्णांचे मृत्यू झाल्याचे सांगत हाफकिनचे नाव धुळीला मिळविल्याबद्दल हाफकिनच्या व्यवस्थापकीय संचालकांना निलंबित करावे, अशी मागणी कॉंग्रेसचे भाई जगताप यांनी केली. यावर मंत्री महाजन म्हणाले, की तुमच्या पत्राला उत्तर दिले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई करा हे योग्य होणार नाही. तुमच्या युनियनला उत्तर दिले नाही म्हणून तुम्ही कारवाईची मागणी करता, असा टोला मंत्र्यांनी भाई जगताप यांना लगावला. विरोधकांनी हाफकिनच्या संचालकांवर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी करून मंत्री महाजन यांना धारेवर धरले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT