मुंबई

एप्रिलचे वेतन मेमध्ये; पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - बायोमेट्रिक यंत्रांच्या तांत्रिक दोषामुळे एप्रिल महिन्याचे वेतन पालिकेच्या हजारो कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळाले नसल्याने कामगार-कर्मचाऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. उद्या सोमवारअखेर (ता. १३) कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार आहे. पालिकेने तसे पत्रक काढून जाहीर केल्याने कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. 

बायोमेट्रिकच्या दोषामुळे कर्मचाऱ्यांच्या हजेरीची नोंद न झाल्याने एप्रिल महिन्याचे वेतन कर्मचाऱ्यांना मिळालेले नाही. त्यात निवडणुकीच्या कामासाठी गेलेल्या हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. पगार न मिळाल्याने पालिकेतील कर्मचारी हवालदिल झाले होते. त्याविरोधात कर्मचारी संघटनाही आक्रमक झाल्या आहेत. कर्मचाऱ्यांची कार्यालयातील उपस्थितीची नोंद करण्यासाठी पालिकेने वर्षभरापूर्वी हजेरीपट पद्धत बंद करून बायोमेट्रिक पद्धत सुरू केली. 

बायोमेट्रिक आणल्यापासून हा घोळ कायम असल्याने कामगार संघटनांनी याला आंदोलनाच्या माध्यमातून विरोध केला. बायोमेट्रिक यंत्रांना पुरेशी इंटरनेट कनेक्‍टिव्हिटी नसल्याने कर्मचारी हजर असल्यास गैरहजर दाखवणे, शिफ्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची योग्य नोंद न होणे, कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या रजांची आणि ड्युटी बदलाची प्रणालीत नोंद न होणे, अशा अनेक समस्या असल्याचा दावा कामगार संघटनांनी केला आहे. 

शून्य वेतनाची स्लिप
नैमित्तिक रजा, साप्ताहिक सुटीच्या यंत्रणेत अपडेट होणे गरजेचे असतानाही त्याऐवजी कामावर न आल्याचा शेरा पडल्याने काहींना   वेतनचिठ्ठीत शून्य दाखवले आहे; तर काहींच्या वेतनात मोठ्या प्रमाणात कपातही झाली आहे. सॅप प्रणाली की मानव संसाधन विभागाने हे काम करायचे, या वादात हा गोंधळ निर्माण झाला असल्याचे कर्मचारी संघटनेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT