Auto rikshaw driver felicitation
Auto rikshaw driver felicitation sakal media
मुंबई

रायगड : रिक्षा व्यवसायात आता महिलाही; अलिबाग पालिकेने राबविले उपक्रम

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग : एकेकाळी रिक्षा चालविणे (Rikshaw driving) फक्त पुरुषांची मक्तेदारी होती; परंतु ती संपुष्टात येण्याची शक्यता आहे. अलिबाग पालिकेने (Alibag Municipal corporation) पुढाकार घेत (training for women's) शहरातील महिलांना रिक्षा व्यवसायात उतरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. यामध्ये १० महिलांनी सहभाग घेतला.

शहरातील महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हाव्यात, यासाठी पालिकेच्या वतीने शहरात वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. यानुसार महिलांसाठी खाद्यपदार्थांसह वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल सुरू केले आहेत. यामुळे महिलांनी तयार खाद्यपदार्थांसह वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणात होत आहे. त्याचा पर्यटकांसह नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

टाकाऊपासून टिकाऊ अशा स्पर्धा घेऊन महिलांना टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू बनविण्याचे धडे देण्यात आले आहेत. आता पुढाकार घेत महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. श्रीसाई मोटार ड्रायव्हिंग स्कूलच्या माध्यमातून हे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात आले. १३ दिवसांच्या या प्रशिक्षणात दहा महिलांनी सहभाग घेतला. त्यांना त्याचे प्रमाणपत्र वाटप केले आहे. त्यामुळे लवकरच शहरात महिला रिक्षा चालविताना दिसणार आहेत.

महिला सक्षमीकरणासाठी अलिबाग पालिकेच्या महिला व बालकल्याण विभागमार्फत शहरातील महिलांना रिक्षा चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. सहभाग घेतलेल्या महिलांना प्रमाणपत्रे देण्यात आली. जागतिक महिला दिनाच्या दिवशीच हा कार्यक्रम पार पडला. महिलांना बॅंकेमार्फत कर्ज मिळवून देऊन रिक्षा व आरटीओकडून बॅच मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.
- प्रशांत नाईक, नगराध्यक्ष, अलिबाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT