nitesh rane
nitesh rane sakal media
मुंबई

नितेश राणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा; शिवसैनिक संतापले

CD

घाटकोपर : आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी पुन्हा वादग्रस्त ट्विट (Controversial statement) केल्याने शिवसैनिक (Shivsena) विरुद्ध राणे नवीन वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिकांमध्ये संताप असून घाटकोपर पोलीस ठाण्यात (Ghatkopar police station) गुन्हा दाखल (Police complaint) करण्याची मागणी त्यांनी केली आहे. (shivsena demands police complaint Against nitesh rane on controversial tweet)

राणे यांनी शिवसैनिकांमध्ये तेढ निर्माण करणारे ट्विट केल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेचे ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी घाटकोपर पोलिसांकडे केली आहे. याबाबत त्यांनी आपले लेखी निवेदन पोलिसांना दिले. २२ डिसेंबर रोजी सकाळी दहाच्यादरम्यान नितेश राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले होते. त्यात त्यांनी ‘तमाम हिंदूंच्या माँसाहेब जिजामाता भोसले यांच्या नावाने असलेल्या उद्यानाचे नाव रातोरात हजरत पिर बाबा अशी कोनशिला लावून बदलले आहे.

आता सत्तेच्या लाचारीसाठी बाळासाहेबांच्या शिवसेनेचे नाव बदलणार का’, असे म्हटले आहे. हे ट्विट सामाजिक तेढ निर्माण करणारे असून संविधानिक पद असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची बदनामी करणारे आहे. या ट्विटचा काहीही संबंध जिजामाता उद्यानाशी नाही. त्यामुळे अशा खोट्या बातम्या पसरवून सामाजिक आणि धार्मिक भावना भडकावून दोन समाजात जातीय दंगल घडवून आणून सामाजिक सलोखा बिघडवण्याचा नितेश राणे यांचा प्रयत्न असून, हे कृत्य समाज विघातक आहे.

त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी सेनेचे विभागप्रमुख राजेंद्र राऊत यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यात केली आहे. अन्य ठिकाणीही तक्रारी यावेळी उपविभाग प्रमुख सुनील मोरे, विलास पवार, तात्या सारंग आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. अशाच तक्रारी शिवाजीनगर, देवनार, मानखुर्द, पंतनगर, पार्कसाईड पोलिस ठाण्यात करण्यात आल्याचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

RR vs KKR : राजस्थान अपयशाची मालिका खंडित करणार? अव्वल स्थानावर असलेल्या कोलकताविरुद्ध आज सामना

Vastu Tips: घरात चांदीच्या वस्तू कुठे ठेवाव्या, वाचा वास्तुशास्त्र काय सांगतं?

Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक घटना! लोकलमधून उतरल्यावर तरूणीवर टाकले ज्वलनशील पदार्थ, लॅपटॉप अन् हार केला चोरी

Sharad Pawar: तेव्हा अजित पवार नवखे होते, २००४ साली मुख्यमंत्री पदाची संधी का घालवली? शरद पवारांनी सांगितला माइंड गेम

SCROLL FOR NEXT