मुंबई

महाराष्ट्र - गोवा व्यापार वृध्दी

CD
‘महाराष्ट्र चेंबर''सोबत सहकार्याची गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची ग्वाही महाराष्ट्र-गोवा व्यापार वृद्धीसाठी महत्त्वाचे पाऊल मुंबई, ता. १ ः ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अ‍ॅण्ड अ‍ॅग्रीकल्चर''ने दिलेल्या विविध संयुक्त उपक्रमांच्या प्रस्तांवासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महाराष्ट्र चेंबरच्या पदाधिकाऱ्यांना दिली. महाराष्ट्र-गोवा व्यापारवृद्धीसाठी हे महत्त्वाचे पाऊल समजले जात आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आज (ता. १) कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स'' चे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली. त्यावेळी सावंत यांनी हे आश्वासन दिले. यावेळी महाराष्ट्र चेंबरच्या शिष्टमंडळाने ‘महाराष्ट्र'' व ‘गोवा‘ या दोन राज्यांत उद्योग-व्यापार-पर्यटन व आय.टी. क्षेत्रात सहकार्याबाबतच्या विविध योजनांचा प्रस्ताव सादर केला. महाराष्ट्र व गोवा या दोन्ही शेजारी राज्यांत सांस्कृतिक व व्यापारी, ॠणानुबंध आहे. याचा फायदा घेऊन दोन्ही राज्यांत पर्यटन आणि व्यापार-उद्योग वाढवता येईल, असे गांधी म्हणाले. आंतरराज्य व्यापार-उद्योग वृद्धीसाठी ‘महाराष्ट्र चेंबर''ने दिलेल्या विविध संयुक्त उपक्रमांच्या प्रस्तांवासाठी सहकार्य करू, अशी ग्वाही सावंत यांनी दिली. या प्रस्तावावर सर्व संबंधितांशी चर्चा करून पुढील निर्णयासाठी लवकरच ‘पणजी‘ येथे ‘महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स''च्या पदाधिकाऱ्यांसमवेत संयुक्त बैठक आयोजित करण्यात येईल, असेही सावंत यांनी नमूद केले. या शिष्टमंडळात भरत गांधी, योगेश केरकर, परशुराम सातार्डेकर, दर्शन गांधी यांचा समावेश होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT