मुंबई

रोजगार देऊ म्हणता, मग एनटीसी गिरण्या बंद का?

CD
रोजगार देऊ म्हणता, मग एनटीसी गिरण्या बंद का? कोईम्तूर येथे सचिन अहिर यांची मोदींवर टीका मुंबई, ता. ६ ः रिकाम्या हातांना रोजगार देऊ, असे म्हणणाऱ्या पंतप्रधानांनी देशातील एनटीसी गिरण्या सुरू होतील, याची काळजी घ्यावी. बेरोजगारी नष्ट करण्याची चर्चा पंतप्रधान करतात, पण एनटीसीच्या गिरण्या बंदच ठेवल्या जातात, ही कोणती नीती, असा प्रश्न राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिन अहिर यांनी कोईम्तूर येथे केला. देशातील एनटीसीच्या पंचवीस गिरण्या पहिल्या लॉकडाऊनपासून सुमारे दीड वर्ष बंदच आहेत. त्या सुरू करण्यासाठी कोईम्तूर येथे झालेल्या कामगार आंदोलनात अहिर बोलत होते. या आंदोलनासाठी नियुक्त केलेल्या राष्ट्रीय समन्वय कृती समितीचे अहिर हे अध्यक्ष आहेत. राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनीही मुंबई-महाराष्ट्रात सर्वशक्तीनिशी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. एनटीसी गिरण्या बंद असल्याने तेथील कामगार व कुटुंबीयांची उपासमार होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्याच महिन्यात कृती समितीच्या वतीने संसदेसमोर जंतरमंतर येथे आंदोलन छेडण्यात आले होते. मंगळवारी कोईम्तूर जिल्हाधिकारी कार्यालयावर अहिर यांच्या नेतृत्वाखाली एनटीसी गिरण्यांमधील कामगारांचा लाँग मार्च आणि निदर्शने करण्यात आली. ... आंदोलने छेडण्याचा निर्णय इंटक, एआयटीयूसी, डीएमके, सिटू, पीएलएफ आदी युनियनच्या कामगार नेत्यांनी आ़ंदोलनात भाग घेतला. विशेष म्हणजे बीएमएसने या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला. काल देशातील सर्व एनटीसी गिरण्यांमधील प्रमुख कामगार नेत्यांची तेथे प्रथम बैठक झाली. महाराष्ट्रातून आंबेकर श्रम संशोधन संस्थेचे संचालक जी. बी. गावडेही उपस्थित होते. लवकरच या प्रश्नावर ज्या-ज्या राज्यामध्ये एनटीसी. गिरण्या आहेत तेथे कामगारांचे आंदोलने छेडण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना समन्वय कृती समितीच्या वतीने याप्रश्नी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मध्यस्थी करण्याची विनंती करण्यात येणार आहे. शिवाय त्या राज्यातील मुख्यमंत्र्यांना आंदोलनाचे नेतृत्व करण्याचाही आग्रह धरण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह पश्चिम बंगाल, गुजरात, आंध्र, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळ, कर्नाटक, पाँडेचेरी या राज्यांत एनटीसी गिरण्या असून या गिरण्यांमधील कामगारनेते या आंदोलनात सहभागी झाले होते. ...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT