मुंबई

म्हाडाने शाळांना दिलेले वर्ग कायम ठेवण्याची मागणी

CD
म्हाडाने शाळांना दिलेले वर्ग कायम ठेवा! मुंबई मंडळास धोरण तयार करण्याचे सभापतींचे निर्देश सकाळ वृत्तसेवा मुंबई, ता. ६ : मुंबई गृहनिर्माण क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील इमारतींच्या पुनर्विकासानंतर महापालिकेच्या शाळांना देण्यात आलेल्या वर्गांचे आरक्षण कायम रहावे, याबाबत धोरण तयार करण्याचे निर्देश मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर यांनी मुंबई मंडळास दिले आहेत. म्हाडाच्या भूखंडांवर असलेल्या पालिकेच्या शाळांतील समस्यांबाबत घोसाळकर यांनी नुकतीच बैठक आयोजित केली होती. या बैठकीला पालिकेचे शिक्षण अधिकारी, उपशिक्षण अधिकारी, अधीक्षक आणि वास्तुशास्त्रज्ञ, तसेच पायाभूत सुविधा कक्ष अधिकारी, म्हाडाचे पदाधिकारी उपस्थित होते. म्हाडाच्या भूखंडांवर असलेल्या इमारतींमध्ये पालिकेच्या शाळांना वर्ग चालविण्याकरिता अनेक वर्षांपासून खोल्या देण्यात आल्या आहेत. या इमारतींचे भाडे पालिकेतर्फे भरले जाते. या इमारती अत्यंत जुन्या व जीर्ण झाल्याचे पालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी या बैठकीत निदर्शनास आणून दिले. या वर्गांच्या खिडक्या, दरवाजे यांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक आहे. तसेच शाळांतील शौचालये तसेच वॉटररूमदेखील धोकादायक स्थितीत असल्याने पालिकेला या दुरुस्ती कामांकरिता मुंबई मंडळाकडून ना- हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक आहे. त्याचबरोबर म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या अखत्यारीतील इमारतींच्या पुनर्बांधणीनंतर या शाळांतील वर्गांचे आरक्षण कायम राहावे, याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. घोसाळकर यांनी शाळा इमारतींना अनुदानाबाबत तपासणी करणे आणि शाळा इमारतींचे बांधकाम ५ वर्षांपेक्षा अधिक कालावधीचे संरचनात्मक सुरक्षा असल्याचे प्रमाणित असणे आवश्यक असल्याची बाब अधोरेखित केली. याबाबत मुंबई मंडळाकडे धोरण असणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Live Update : जळगाव-पाचोरा रोडवर भीषण अपघातात; ३ शाळकरी मुलांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT