मुंबई

रिलायन्स रिटेलची डंझोमध्ये २४ कोटी डॉलर ची गुंतवणूक

CD
रिलायन्स रिटेलची डंझोमध्ये २४ कोटी डॉलरची गुंतवणूक मुंबई, ता. ६ ः वेगवेगळ्या वस्तू ग्राहकांच्या घरी पोहोचविणाऱ्या डंझो या स्टार्टअपमध्ये २४ कोटी डॉलरची गुंतवणूक केल्याचे रिलायन्स रिटेलतर्फे आज जाहीर करण्यात आले. यामुळे रिलायन्स रिटेलला या कंपनीत २५.८ टक्के वाटा मिळेल. रिलायन्सला या खरेदीमुळे साहित्याची वेगवान डिलीव्हरी करण्याच्या क्षेत्रात प्रवेश मिळेल. त्यानुसार आता डंझो कंपनीचे एकूण मूल्यांकन ८० कोटी डॉलरच्या आसपास होईल. कबीर बिस्वास यांनी सन २०१६ मध्ये स्थापन केलेल्या कंपनीने आतापर्यंत १४ कोटी डॉलर उभे केले आहेत; तर या सहकार्यामुळे डंझोला ब्लिंकइट (आधीचे ग्रोफर्स), झेप्टो, स्वीगीचे इन्स्टामार्ट व बिगबास्केट या सुपरमार्केटबरोबर स्पर्धा करता येईल. आता डंझो आपल्या नेहमीच्या वस्तूंप्रमाणे वाणसामान व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आपल्या ग्राहकांना करू शकेल. यापूर्वी ब्लूम व्हेंचर्स, गुगल, लाईटबॉक्स व्हेंचर्स यांनीही डंझोमध्ये गुंतवणूक केली आहे. आम्ही सुरुवातीपासूनच ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला. आता झालेली ही गुंतवणूक म्हणजे आमच्या या सेवेला मिळालेली पावती आहे, असे बिस्वास यांनी सांगितले. यामुळे आमचाही रिटेल क्षेत्रात प्रवेश होईल व आमचा विकास होईल, असेही ते म्हणाले. सध्या ब्लिंकइट व झेप्टोतर्फे दहा मिनिटांत साहित्य घरपोच दिले जाईल, अशी जाहिरात केली जाते; तर डंझोतर्फे १९ मिनिटांत सामान पोहोचवले जाते. स्वीगी, टाटासोबतही चर्चा रिलायन्सला आता वाणसामान पोहोचवण्यासाठी जिओ मार्टच्या सेवेबरोबरच डंझोची सेवादेखील मिळेल. मागील वर्षी रिलायन्सने दूध घरपोच देणारी मिल्क बास्केटची सेवा ताब्यात घेतली होती. डंझोमध्ये गुंतवणूक करण्यासाठी झोमॅटो, स्वीगी व टाटा ग्रुपबरोबरही चर्चा झाली होती, मात्र ती यशस्वी झाली नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT