दिया मिर्झाने शेअर केला मुलाचा पहिला फोटो बॉलीवूड अभिनेत्री दिया मिर्झा नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. आता दिया मिर्झाने तिच्या गोंडस बाळाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. दियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीला बाळाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अव्यान खेळताना दिसत आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. पहिल्यांदाच दियाने तिच्या मुलाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. यामध्ये अव्यान अतिशय गोंडस दिसत असून त्याच्या गालावर खळी पडत आहे. सध्या त्याचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अनेक जण त्याची तुलना इतर स्टार किड्ससोबत करत आहेत.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.