मुंबई

तळोज्‍यात जमावबंदीचे आदेश धाब्यावर

CD
तळोजामध्ये जमावबंदीचे आदेश धाब्यावर कोरोनाच्या संख्येत वाढ होत असताना अनधिकृत बाजार जोरात खारघर, ता. ११ (बातमीदार) ः राज्यात कोरोनाचे प्रमाण वाढत असल्यामुळे शासनाने कोरोना निर्बंध कठोर केले असून सकाळी पाच ते रात्री अकरा वाजेपर्यंत जमावबंदी लागू केली आहेत. असे असताना तळोजा वसाहतीत जमावबंदीचे आदेश झुगारून अनधिकृत आठवडा बाजार भरविला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी आहे. आठवडी बाजार भरविणाऱ्या व्यक्तीवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पालिकेच्या अतिक्रमण पथकावर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. पनवेल महा क्षेत्रातील खारघर नोडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अधिक असताना खारघरमधील ओवेगाव, खुटुकबांधण, खारघर सेक्टर १९ तसेच तळोजा फेज एक आणि दोन मध्ये आठवडी बाजार भरविले जात आहे. खारघरमधील वाढते अतिक्रमण रोखण्यासाठी पालिकेने खारघर, तळोज्‍यासाठी सकाळ आणि दुपार सत्रात दोन स्वतंत्र अतिक्रमण पथकांची नियुक्ती केली आहे. सरकारने राज्यात दिवसा जमाव बंदी लागू केली असताना तळोजा सेक्टर चारमध्ये सोमवारी सायंकाळी पाच ते रात्री नऊ वाजेपर्यंत भरविण्यात आलेल्या आठवडी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यात अनेकजण विनामास्‍क फिरत होते. बंदी असतानाही आठवडी बाजार भरविले जात असून कारवाईकडे दुर्लक्ष केला जात आहे. याचा अर्थ आठवडी बाजार भरविणाऱ्या दादा मंडळींवर कुणाचातरी वरदहस्‍त असल्‍याचे नागरिकांचे म्‍हणणे आहे. कारवाईचा देखावा पनवेल महापालिकेने बांधकाम, फेरीवाले आणि आठवडी बाजार आदी अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी सकाळ आणि दुपार दोन सत्रात पथकाची निर्मिती केली आहे. आठवडी बाजार विषयी नागरिकांनी पालिकेकडे कारवाईची मागणी केल्यास तत्काळ कर्मचारी पाठवून कारवाई केली जाईल, असे उत्तर दिले जाते. मात्र अतिक्रमण पथक रात्री नऊनंतर बाजार उठताना कारवाईचा केवळ देखावा करीत असल्‍याचे परिसरातील स्‍थानिकांचे म्‍हणणे आहे. तळोजा फेज एक मध्ये आठवडी बाजार सुरू असल्याची माहिती मिळताच, अतिक्रमण पथकाने त्वरित बंद केले. तसेच या ठिकाणी पदपथ अडवून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. - जितेंद्र मढवी, प्रभाग अधिकारी, खारघर फोटो

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dr. Jaysingrao Pawar Passes Away: शिवकालीन आणि शाहूकालीन इतिहास उजळवणारा संशोधक हरपला; डॉ. जयसिंगराव पवार यांचे निधन!

Satara ZP Controversy: सातारा झेडपीतील गोंधळाचे मंत्री गोरेच सूत्रधार: देसाई, मांडवे; आमचा एन्काउंटर करण्याचा पोलिसांचा होता डाव!

लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये! एप्रिलमध्ये ज्यांना मिळेल लाभ, त्यांचाच सुरु राहणार लाभ; ‘ई-केवायसी’तील दुरुस्तीसाठी ३१ मार्च मुदत, वाचा...

Panchang 26 March 2026 : दत्त कवच स्तोत्राचे पठण आणि ‘बृं बृहस्पतये नमः’ या मंत्राचा जप करावा

आजचे राशिभविष्य - 26 मार्च 2026

SCROLL FOR NEXT